Barsu Refinery : रिफायनरी परिसरातील जागा कोणाच्या नावावर? सुषमा अंधारेंनी यादीच वाचून दाखवली

“तूम्हाला विकास करायचा आहे ना? पण लोक ठरवतील ना.. त्यांना विकास हवा आहे की नाही. जर लोकांची इच्छा नसेल तर तुम्ही जबरदस्ती का करत आहात?” असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. याच विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की बारसू प्रकरणातील जे स्थानिक अधिकारी आहे, त्यांची बहीण शिवसेना (शिंदे गट) बीडच्या […]

sushma andhare

sushma andhare

“तूम्हाला विकास करायचा आहे ना? पण लोक ठरवतील ना.. त्यांना विकास हवा आहे की नाही. जर लोकांची इच्छा नसेल तर तुम्ही जबरदस्ती का करत आहात?” असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. याच विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की बारसू प्रकरणातील जे स्थानिक अधिकारी आहे, त्यांची बहीण शिवसेना (शिंदे गट) बीडच्या संघटिका आहेत. हा योगायोग आहे की काही कारण आहे का?

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू (Barsu Refinery) येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सरकारवर मोठा हल्लाबोल केला होता. आंदोलक ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील यावरून सरकारला धारेवर धरलं आहे.

सत्तार भावनिक माणूस, सत्तारांच्या वक्तव्यावर विखेंचं स्पष्टीकरण

या परिसरातील जमिनी कोणाच्या?

रिफायनरी परिसरातील ज्या लोकांची जमीन आहे. त्यातील काही लोक ४० लाख रुपये एकरी मागत आहेत. ज्या लोकांच्या नावावर जमिनी आहेत. त्या लोकांची यादीच सुषमा अंधारे यांनी यावेळी वाचून दाखवली. यामध्ये अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता यांची ९२ एकर जमीन असल्याची माहिती त्यांनी दिली. हे गुप्ता दाम्पत्य आयआरएस अधिकारी आहेत.याची किरीट सोमय्या यांनी माहिती दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांच्या नावावर देखील याठिकाणी १८ एकर जमीन असल्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली. याशिवाय त्यांनी आणखी काही नावे सांगितली, त्यात मराठी नावे किती आहेत, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.

भावी मुख्यमंत्री, उत्साही कार्यकर्ते, नेत्यांना गुदगुल्या

दरम्यान बारसू रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्पाच्या विरोधात आज मोर्चा काढला जाणार आहे. गेल्या काही दिवसापासून बारसू रिफायनरी विरोधात ज्या माळरानावर आंदोलन केलं जात आहे, त्याच माळरानावर आज मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचं नेतृत्व ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version