भावी मुख्यमंत्री, उत्साही कार्यकर्ते, नेत्यांना गुदगुल्या

भावी मुख्यमंत्री, उत्साही कार्यकर्ते, नेत्यांना गुदगुल्या

प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी )

Future chief minister : गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता कमालीची ताणली गेली आहे. कोण कुठे जाणार याचा नेम नाही. मग त्याचे नाव काहीही असो. आपण विचाराल व्हाट इज़ युवर नेम? समोरून उत्तर येतो आपल काही नेम नाही. अशीच अवस्था आणि संशयाचे धुके महाराष्ट्रच्या राजकारणात झाले आहे.

अनेक कार्यकर्ते आणि समर्थकाना आपला नेता मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेला दिसतोय. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. अनेकांसाठी जसा हा धक्का होता तसा तो शिंदे यांच्यासाठी ही धक्काच होता. राजकारणात काहीही होऊ शकत हे नक्की. या घटनेपासून अनेकाना राजकारणात काहीही होऊ शकते अस वाटू लागले आहे.

सध्या आपला नेता म्हणजे भावी मुख्यमंत्री अशा कार्यकर्त्यांची सर्वत्र गर्दी झाली आहे. सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झाली. मुंबई पेडर रोड आणि राष्ट्रवादी कार्यालयाजवळ जयंत पाटील ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लागले आणि चर्चा सुरु झाली.

ही चर्चा बरेच दिवस झाल्यानंतर अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर लागले. पक्षांतर्गत स्पर्धा हा अंदाज बांधत असताना ही चर्चा काही दिवसानंतर थांबली. आता अजित पवार हे नाराज असणे, पक्षातून बाहेर पाडण्याच्या बातम्या सुरु झाल्या. कार्यकार्यांनी थेट अजित दादा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले.

तिकडे जयंत पाटील यांच्या सांगलीत खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांना भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर संबोधले. तिकडे मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये आलेले विखे पाटील देखील मागे नाहीत. त्यांचे जवळचे नेते मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील विखे पाटील यांना भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर करुन टाकले.

काहीही असो आपला नेता खूश झाला ना , चर्चेत आला ना याच समाधान नक्कीच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असणार हे नक्की. तर दुसरीकडे नेत्याना नुसती चर्चा झाली तरी पोटात गुदगुली झाल्याचा फिल होणे हे ही कमी नाही. पण अनेक प्रश्न बाजुला पडून जनतेचं मनोरंजन सुरु आहे का हाही विचार होणे गरजेच आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube