एकनाथ शिंदे किती दिवस डबल ढोलकी वाजवणार? 25-30 आमदार पाडणार; मनोज जरांगे भडकले

Manoj Jarange On Eknath Shinde :  राज्यात कुणबी जातप्रमाणपत्रे अवैध ठरवून रद्द करण्यात आल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी

Manoj Jarange On Eknath Shinde

Manoj Jarange On Eknath Shinde

Manoj Jarange On Eknath Shinde :  राज्यात कुणबी जातप्रमाणपत्रे अवैध ठरवून रद्द करण्यात आल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला असं म्हणत माझ्याविरोधात मोठा कट रचला गेला असून सरकारकडून मराठ्यांचे वाटोळं सुरु असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना केला आहे.

अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे आयोजित पत्रकार परिषेदत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, मला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून अपेक्षा नव्हती. किती दिवस डबल ढोलकी वाजवणार. मी मिंधा नाही, जेलमध्ये सुद्धा जायला घाबरणार नाही. तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला. मीडियात जाहीर पणे सांगितलं होतो. जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी आमच्या लेकराचं वाटोळं करत आहात का? यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे साहेब मी तुमचे सर्व लोकं झोपून टाकील, पाडून टाकीन. उद्धव ठाकरे यांना बरा म्हणायची वेळ आली आहे. बावनकुळे फडणवीस यांचा मालक झाला आहे का? शिंदे त्यांच्या कॉलेजमध्ये बैठका घेत आहेत. मी खूपच जास्त खुनशी आहे. एकदा जर डोक्यात गेला तर सोडणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भुमरेमामा, तुम्ही सहाव्या नंबरवर होता. तुम्हाला निवडून आणण्यासाठी मराठ्यांच्या पोरांनी काम केलं. पण तुम्ही आमचाच मामा करायला निघाला. तुम्ही मराठ्यांचं नुकसान करणार असाल तर शिंदेंच्या सगळ्या सीट आम्ही पाडणार. तुमच्या नोटा काम करणार नाहीत असं देखील यावेळी मनोज जरांगे म्हणाले.

… तर राजीनामा द्या अन् घरी जा; तुकाराम मुंढेंचा कर्मचाऱ्यांना इशारा

माझ्याविरोधात मोठा कट रचला गेला

तर पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, माझ्याविरोधात मोठा कट रचला गेला असून सरकारकडून मराठ्यांचे वाटोळं सुरु आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण या संपूर्ण कटाचा मी लवकरच पर्दाफाश करणार असून सगळी माहिती बाहेर आणणार असं देखील मनोज जरांगे म्हणाले.

Exit mobile version