Latur News : 15 वर्षीय मुलीची अघोरी लक्ष्मीपूजा अन् 20 कोटींचा पाऊस…भोंदूबाबाची काळी कृत्ये…

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कथित लक्ष्मीपूजेच्या तयारीत असणाऱ्या भोंदूबाबाला लातूर ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Bhondu Baba Latur

Bhondu Baba Latur

Latur News : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कथित लक्ष्मीपूजेच्या तयारीत असणाऱ्या भोंदूबाबाला (Bhondu Baba) लातूर ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आलीयं. भोंदूबाबाने आपल्या भक्तांना 15 ते 20 कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडण्याचं अमिष दिले होते. त्यानुसार कथित लक्ष्मीपूजेची तयारी करण्यात आली. मात्र, लातूर पोलिसांनी हा डाव उधळून लावला आहे. बालाजी मंगल बलराज (38. तेलंगणा) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

‘17 सप्टेंबरनंतर काय होतं ते बघा’; संजय राऊत आक्रमक, फडणवीस-शिंदेंवर गंभीर आरोप अन् मोदींवरही निशाणा

लातूरच्या उदगीत तालुक्यातील करडखेलच्या पाटीजवळ हा प्रकार 16 ऑगस्टला समोर आला. संबंधित ठिकाणी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कथित लक्ष्मीपूजेची तयारी करण्यात आली. या कथित विधीसाठी आंध्र प्रदेशातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे.

भोंदूबाबाकडे असंख्य भाविक येत असून त्यातील काही भाविकांना भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुणे परिसरातील एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 13 संशयित आरोपींना ताब्यात
घेण्यात आले आहे.

अभिनेता गोविंदासोबत वाद कसा मिटला?, घटस्फोटाचा अर्ज मागं का घेतला?, पत्नी सुनीता अहुजा यांची भूमिका काय?

बालाजी मंगल बलराज हा कथित लक्ष्मीपूजेची तयारी करीत असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलम 3 (3) तसेच पॉक्सो कायद्यातील कलम 12 आणि 18 अन्वये गुन्हा दाखल आहे. अटक केलेल्या आरोपीसह इतर संशयितांची चौकशी सुरू आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते ‘लग्न आणि बरंच काही’ चे मंत्रालयात पोस्टर अनावरण

दरम्यान, संपूर्ण राज्यभरात अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका नव्या भोंदूबाबाचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तपासादरम्यान इतरही अनेक आरोपींना अटक होण्याची शक्यता असून आरोपी हा व्यवसायाने तांत्रिक आहे. त्याने लोकांशी कसा संपर्क केला? विधीमागे अघोरी कृती होती का? याबाबतचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Exit mobile version