Latur News : पेरणीच्या तोंडावर बैलाचा मृत्यू, शेतकऱ्याने पत्नीलाच जुंपले औताला…

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावात बैल मृत पावला म्हणून शेतकऱ्याने पत्नीलाच नांगराला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झालायं.

Latur Farmer

Latur News : ऐन पेरणीच्या तोंडावरच बैल वीज पडून मृत्यू पावल्याने शेतकऱ्याने आपल्या पत्नीला नांगराला जुंपून घेत नांगर ओढल्याचं दिसून आलंय. शेतकऱ्याचं ह्रदयद्रावक वास्तव दाखवणारी ही घटना लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावात घडलीयं. स्वत:ला औताला जुंपून औत ओढणाऱ्या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेक नेटकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरुन भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इतिहासातलं सर्वात मोठं पाऊल! भारताकडून 12 अण्वस्त्रे तैनात; ‘सिपरी’चा अहवाल

हौसाबाई काशीनाथ गायकवाड असं या महिलेचं नाव असून त्या शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या पत्नी आहेत. काही दिवसांपूर्वीच गायकवाड यांचा एक बैल वीज पडून मृत्यूमुखी पडला. सध्या खरीप हंगामातील पेरणी सुरु असताना दुसरा बैल खरेदी करण्याची अर्थिक परिस्थिती नसल्याने कुटुंबाने स्वत:च मशागतीचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी एक लाख वीस हजार रुपये खर्च करून त्यांनी बैलजोडी खरेदी केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला. आधीच आर्थिक संकट, त्यात नव्या बैलासाठी पैसा नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी सुसंवादासाठी खास व्यासपीठ सुरू होणार; परीक्षेच्या प्रक्रियेसाठी आयोग नेमणार

काशिनाथ गायकवाड नांगर हाकत असताना त्यांनी आपल्या पत्नी हौसाबाई काशिनाथ गायकवाड यांनी दुसऱ्या बैलाच्या जागी औत ओढण्याचं काम केलंय. वृद्धापकाळातही शेती वाचवण्यासाठी लातूरच्या या दाम्पत्याचा संघर्ष सुरु आहे. काशिनाथ गायकवाड आणि हौसाबाई गायकवाड यांच्या पत्नीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कठोर वास्तव्यावर नेटकऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हलाखीच्या परिस्थितीत आयुष्य जगत असलेल्या या शेतकरी दाम्पत्याला मदत देण्याची मागणीही करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय! मागील कर्जमाफी न मिळालेल्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी

गायकवाड दाम्पत्य मागील अनेक वर्षांपासून लातूरमध्ये बटईने शेती करीत आहे. हे कुटुंब यंदाच्या वर्षी 10 एकर जमीन कसत आहे. स्वत:च्या नावावर एक एकर सुद्धा जमीन नाही. बटईने घेतलेल्या शेतीवरच ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी बटईच्या शेतीवरच चार मुलींचे लग्न, दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे.

दरम्यान, शेतकरी दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी काशिनाथ गायकवाड यांच्या बैलाचा पंचनामा झाल्याचं सांगितलं असून लवकरच त्यांच्या खात्यावर 32 हजार रुपयांची मदत जमा करणार असल्याचं सांगितलंय.

follow us