CM असावा तर असा! शेतकऱ्याने नांगराला जुंपवले, फडणवीसांनी बैल देऊन पत्नीचे कष्ट वाचवले…
शेतकऱ्याने आपल्या पत्नीला नांगराला जुंपल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शेतकऱ्याच्या मदतीला धावले आहेत.
CM devendra Fadanvis Help Latur Farmer : लातूरमध्ये एका शेतकऱ्याने बैल मृत्यू पावला म्हणून आपल्या पत्नीलाच औताला जुंपल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर शेतकऱ्याच्या दयनीय अवस्थेवरुन नेटकऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. हाच व्हिडिओ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पाहिल्यानंतर त्यांनी थेट लातूरचे जिल्हाधिकारी —–यांना फोन करत शेतकऱ्याला तातडीने बैलाची मदत केलीयं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला गोशाळेमधून बैल उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्याच्या पत्नीचे कष्ट वाचणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्याच्या मदतीला धावल्याने मुख्यमंत्री असावा तर असा, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून दिली जात आहे.
मोठी बातमी : कांद्याच्या बाजारभावासाठी आता उपसमिती; कोणा-कोणाचा समावेश झालाय ?
काही दिवसांपूर्वीच हौसाबाई काशिनाथ गायकवाड आणि काशिनाथ पुंडलिक गायकवाड या दाम्पत्यांचा बैल वीज पडून मृत्यू पावला होता. ऐन पेरणीच्या तोंडावर या दाम्पत्याकडे दुसरा बैल घेण्याची अर्थिक ताकद नव्हती. त्यामुळे शेतकरी काशिनाथ गायकवाड यांनी आपली पत्नी हौसाबाई यांनाच औताला जुंपत काशिनाथ नांगर हाकत होते. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल झाला. या शेतकऱ्याने काही महिन्यांपूर्वी एक लाख वीस हजार रुपये खर्च करून त्यांनी बैलजोडी खरेदी केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला. आधीच आर्थिक संकट, त्यात नव्या बैलासाठी पैसे नव्हते. त्यामुळेच शेतकऱ्याने आपल्या पत्नीला औताला जुंपले होते.
तुकाराम मुंढेंकडून धाड टाकण्याचा धडाका; पुणे, कोल्हापुरात मेडिकल फर्मवर छापा, लाखांची औषधं जप्त
या घटनेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना फोन केला. या शेतकऱ्याची संपूर्ण परिस्थिती समजून घेतली. गायकवाड दाम्पत्य मागील अनेक वर्षांपासून लातूरमध्ये बटाईने शेती करीत आहे. त्यावरच ते आपला उदरनिर्वाह करीत आहे. शेतकऱ्याची परिस्थिती समजून घेतल्यानंतर फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्याला तत्काळ बैल उपलब्ध करुन देण्याची सूचना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी बास्टेवाड यांनी गोशाळेतून बैल शेतकऱ्याला उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याची पत्नी हौसाबाई गायकवाड यांचे कष्ट वाचणार आहेत.
दरम्यान, शेतकरी दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी काशिनाथ गायकवाड यांच्या बैलाचा पंचनामा झाल्याचं सांगितलं असून लवकरच त्यांच्या खात्यावर 32 हजार रुपयांची मदत जमा करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: दखल देत शेतकऱ्याला तत्काळ मदत करण्यासाठी धावले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळीच घेतलेली दखल आणि शेतकऱ्याला केलेली मदत नक्कीच प्रशंसनीय असल्याची भावना व्यक्त केली जा आहे.