तुम्ही भुजबळ सोडा ओबीसी कार्यकर्त्यालाही हात लावून दाखवा; ओबीसी एल्गार मेळाव्यातून हाकेंचा इशारा

ओबीसी कार्यकर्त्यालाही हात लावू शकत नाहीत असं म्हणत हाके यांनी जरांगे यांना डीवचलं आहे. त्याचबरोबर जरांगे यांच्यावरही टीका केली.

Hake

Hake

बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी एल्गार मेळावा आज शुक्रवार (दि. 17)रोजी (OBC) आयोजीत करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना लक्ष्मण हाके यांनी नाव न घेता मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. भुजबळ यांना बीडमध्ये येऊ देणार नाही असं काही लोक म्हणत होते. परंतु, तुम्हला सांगतो, भुजबळ सोडा तुम्ही ओबीसी कार्यकर्त्यालाही हात लावू शकत नाहीत असं म्हणत हाके यांनी जरांगे यांना डीवचलं आहे. त्याचबरोबर जरांगे हा 4 थी नापास माणूस असल्याचही ते यावेळी म्हणाले.

‘एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणांच्या अन्नामध्ये विष कालवण्याचे काम या सरकारकडून झालं आहे. हा जरांगे उठसूट भुजबळांवर टीका करतो, धनंजय मुंडेंवर टीका करतो. या जरांगेविषयी बोलायचं झाल्यास चौथी नापास गडी. मुख्यमंत्र्यांची आय-माय काढणारा हा माणूस, मुख्यमंत्री महोदय हा तुमचा अपमान नाही तर राज्यातील 14 कोटी जनतेचा अपमान आहे.

मराठा समाज अन् आमच्यात अंतर पडल ते या दरिंदे पाटलामुळे; भुजबळांची बीडमधून जरांगेंवर टीका

आम्ही ओबीसी बांधवांनी तुम्हाला मतदान दिले, ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला आम्ही घरी बसवलं. त्याच तुम्ही आम्हाला काय फळ दिल? तर हा जी आर काढला. इथ गावगाड्यातील सर्व लोकं उपस्थित आहेत. आपली लोकं टार्गेट केली जात आहेत, आरक्षण संपवलं आहे. लोकनियुक्त सरकारकडून आरक्षणाचं संरक्षण झालं नाही. जर आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावं लागत असेल तर तुम्ही काय कामाचे?

त्याचबरोबर हाके म्हणाल, जीआर काढून आरक्षण मिळत नाही, यासाठी तुम्हाला खालच्या समाजात यावं लागेल, आमच्या लोकांनी त्रास सहन केला आहे. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कायदा नाही. ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. मराठी समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका ही आमची भूमिका आहे.’

Exit mobile version