Milind Narvekar In Pandharpur Ashadhi Ekadashi 2025 : शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) या दोन पक्षप्रमुखांचा मेळावा मुंबईत साजरा होत होता. यावेळी मेळाव्याच्या ठिकाणी अनेक दिग्गज नेते हजर (Maharashtra Politics) होते. परंतु या मेळाव्याला अनुपस्थित असलेलं एक नाव मात्र, सगळ्यांच्या ओठांवर होतं. एक चेहरा अनेकांच्या दृष्टिपथात या मेळाव्यात आला नाही, ते नाव होतं शिवसेनेचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचं.
महत्वाचा मेळावा सोडून पंढरपूर गाठलं
दोन बंधू एकत्र येत असताना, उद्धव ठाकरे यांची सावली म्हणून वावरणारे मिलिंद नार्वेकर या महत्वाच्या मेळाव्याच्या वेळी कुठे होते? असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. मात्र, या प्रश्नाचं उत्तर पंढरपुरात मिळालेलं (Ashadhi Ekadashi 2025) आहे. मिलिंद नार्वेकरांनी हा महत्वाचा मेळावा सोडून पंढरपूर गाठलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून मिलिंद नार्वेकर दर आषाढी एकादशीच्या पूजेला जात असतात. यंदाही ते मेळावा सोडून आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला गेले होते.
टेक्सासमध्ये हाहा:कार! मुसळधार पावसाने पुरस्थिती, आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू तर 27 जण बेपत्ता
अवघा रंग एक झाला…
त्यांनी यासंदर्भात आज सामना या दैनिकात एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीवरून देखील चर्चा सुरू झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिलेल्या जाहिरातीमध्ये त्यांनी ‘अवघा रंग एक झाला’ असं म्हणत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातून या मनोमिलनाला आषाढी एकादशीचा मुहूर्त लाभलेला आहे, असं तर नार्वेकर यांनी या जाहिरातीतून सांगण्याचा प्रयत्न केला नाही ना, याची देखील चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
सेकंड लाईन कम्युनिकेशन?
मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे आमदार असले तरी, सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचा संपर्क असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात असताना त्याच्या काही तास आधीच मिलिंद नार्वेकर यांनी आपली पूजा आटोपून घेतली होती. मात्र, या दोघांची भेट झाली की नाही, हे समजू शकलेले नाही. शिवसेनेचे इतर नेते भाजपवर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतात. मात्र मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांचं सोशल मीडियाद्वारे कौतुक करीत असतात. त्यामुळे विरोधी नेत्यांशी सेकंड लाईन कम्युनिकेशन ठेवण्यासाठी नार्वेकर या गोष्टीचा वापर करीत नाही ना, अशी देखील चर्चा सुरू असते. मात्र, अवघा रंग एक झाल्याचं टायमिंग नार्वेकरांनी साधत आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजकारणात रंग भरला आहे, हे निश्चित.
प्रत्येक पक्षात अशी काही माणसं असतात, जी जगत मित्र असतात. आमच्याकडे नार्वेकर असं कॅरेक्टर आहे, जे जगत मित्र आहेत. सगळ्या पक्षांशी ते जुळवून घेतात. एखादं असं केमिकल असतं, की इतर कोणत्याही केमिकलसोबत जर रासायनिक अभिक्रिया व्हायची असेल तर त्याची ती होवू शकते, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली होती.