Loha Municipal Council Election Result : राज्यातील आज 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे नांदेडमधील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोह नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने लोहा नगर परिदष राज्यातील राजकारणात चर्चेत आली होती. मात्र आता लोहा नगरपरिषदेमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
एकाच कुटुंबातील सहा जण पराभव झाल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात लोहा नगरपरिषद (Loha Municipal Council Election Result) चर्चेत आली आहे. या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली होती तर गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर केली होती मात्र यासर्वांचा निवडणुकीत पराभव झाला असून नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने लोहा नगर परिषद निवडणूक लढवली होती मात्र अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने आता अशोक चव्हाणांवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
तर दुसरीकडे नेवासे नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गटाचे करणसिंह घुले विजयी झाले आहेत. पण नगरसेवकांचे बहुमत त्यांच्या सोबत नाही. एकूण 18 जागा पैकी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 10 नगरसेवक निवडून आले. महायुतीचे 6, आम आदमी पक्ष 1 तर अपक्ष 1 असे नगरसेवक विजयी झाले.
Bhor Election Result : संग्राम थोपटेंना पुन्हा धक्का, भोरमध्ये अजितदादांच्या आमदारांनी मारली बाजी
तर अकलूज नगरपरिषदेत एकूण 13 प्रभाग, 26 उमेदवार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 22 उमेदवार विजयी झालेत. तर भाजपचे 4 उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत.
