Download App

Lok Sabha Election ड्युटीवर न येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई; निवडणूक आयोग ठाम

Lok Sabha Election Action on Teachers not on Election Duty : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) इलेक्शन ड्युटीवर ( Election Duty ) न येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई ( Action on Teachers ) केली जाणार आहे. अशी ठाम भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयामध्ये घेतली आहे. तर विनाअनुदानित इंग्रजी शाळातील शिक्षकांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने देखील नकार दिलेला आहे. त्यामुळे आता शिक्षकांना इलेक्शन ड्युटीवर हजर राहणे बंधनकारक असणार आहे.

मोदींनंतर अमित शाहंचा महाराष्ट्र दौरा; नांदेडमध्ये चिखलीकरांसाठी प्रचाराची तोफ धडाडणार

शिक्षकांचे शिकवणे, शाळांचा कारभार पाहणे हे मुख्य काम सोडून त्यांना निवडणुकीच्या कामांमध्ये जुंपले जात असल्याची तक्रार उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावर सुनावणी पार पडली. त्यावेळी निवडणूक आयोगाने जे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी येणार नाही. तसेच संबंधित ट्रेनिंग पूर्ण करणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी ठाम भूमिका घेतली आहे.

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार-ट्रकच्या धडकेत तिघे गंभीर जखमी

यामध्ये विनाअनुदानित इंग्रजी शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सुटका मिळावी. अशी देखील मागणी करण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाने तसा दिलासा देण्यास देखील नकार दिला आहे. तर या अगोदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्षकांच्या निवडणुकीचं काम करण्याच्या आदेशाला विरोध केला होता.

त्यानंतर मंगळवारी झालेल्या मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या भाषणात देखील राज ठाकरे यांनी डॉक्टर आणि नर्सेसने निवडणुकीच्या ड्युटीवर जाऊ नये, तुम्हाला कामावरुन कोण काढतं तेच पाहतो, असा सज्जड इशारा दिला होता. लोकसभा निवडणूकांच्या कामासाठी डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटीला जुंपण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरुन राज ठाकरे यांना जाहीर सभेतच भाष्य करीत इशारा दिला आहे.

follow us

वेब स्टोरीज