Loksabha Elections 2024 : अखेर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी ( Loksabha Elections 2024 ) पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यानंतर चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये एकीकडे युती आणि आघाडी यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी ( Maratha Reservation ) आक्रमक मराठा समाज देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक यंत्रणांची दमछाक करून सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका इव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेतल्या जाऊ शकतात. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेल्या मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्यातील सर्व 48 मतदार संघात मराठा समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत असे आवाहन केलं आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल. त्यामुळे ईव्हीएमवर निवडणुका घेणे निवडणूक आयोगासाठी कठीण होईल. त्यामुळेच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.
निवडणुकांपूर्वीच विखेंचे नगरकरांना मोठे गिफ्ट! रस्ते विकासासाठी ‘एवढा’ निधी मंजूर
ईव्हीएम बाबत बोलताना चोक्कलिंगम म्हणाले की, ईव्हीएमची सध्याची तांत्रिक क्षमता ही 384 उमेदवारांपर्यंतच आहे. त्यामुळे जर एका मतदारसंघात 384 हून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास यंत्रणेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणुक घ्यावी लागेल. तर राज्यात सध्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्या संख्येबद्दल सांगायचं झालं तर 2.47 लाख बॅलेट युनिट, 1.45 लाख कंट्रोल युनिट आणि एकूण 1.53 लाख व्हीव्हीपॅट यंत्रणा असणार आहे.
Kareena Kapoor : वयाच्या ४२ व्या वर्षीही करीना कपूर दिसतेय बोल्ड
दरम्यान मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या आग्रही मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) प्रत्येक गावातून दोन मराठा समाजाचे (Maratha Community) उमेदवार उभे करण्याचे नियोजन केले जात आहे. तसे ठरावही धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv) काही ग्रामपंचायतींमध्ये केले आहेत. अशावेळी निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवार असण्याची शक्यता आहे. मात्र मराठा समाजाच्या या निर्णयामुळे निवडणूक आयोगाची मोठी कोंडी झाली आहे.