Download App

मंत्रिपदासाठी प्रयत्न पण मिळणार नाही, सुरेस धस आक्रमक; धनंजय मुंडेंवर टिकास्त्र

Suresh Dhas On Mahadev Munde Case : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा बीड (Beed) जिल्ह्याचे नाव चर्चेत आले आहे. आज स्वर्गीय महादेव मुंडे

  • Written By: Last Updated:

Suresh Dhas On Mahadev Munde Case : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा बीड (Beed) जिल्ह्याचे नाव चर्चेत आले आहे. आज स्वर्गीय महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे. यावेळी भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) देखील उपस्थित होते. महादेव मुंडे यांचे फोटो पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोक्याला हात लावला आणि आरोपींना तात्काळ अटक करणार असं आश्वासन मुंडे कुटुंबियांना दिले असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी दिली. तसेच महादेव मुंडे हत्या प्रकरणात पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

तर महादेव मुंडेंचे (Mahadev Munde) खुनी सापडतील. या हत्यात काही पोलीस अधिकारी देखील सहभागी आहेत त्यांचे नावे देखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे. असेही माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले. बीड पोलिसांकडून अनेकदा हलगर्जीपणा झाला आहे. बीड जिल्ह्यात 13 ते 14 हत्या झाल्या असल्याचा दावा देखील त्यांनी केला. तर दुसरीकडे यावेळी सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळणार नसल्याचा दावा देखील केला.

धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळणार नाही

माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, मला वाटत नाही धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना मंत्रीपद मिळणार. मंत्रिपदासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहे पण त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेतले तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. बीड जिल्ह्यातील बापू आंधळे प्रकरण पेंडिंग आहे. गित्ते हत्या प्रकरणात तपास बाकी आहे. अजून देखील काही फाईल्स उघडल्या पाहिजेत. बालाजी मुंडेंची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणात त्यात ड्रायव्हरला आरोपी करण्यात आले असल्याचा दावा देखील आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना केला.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, संभाजीनगर परभणी रेल्वे लाईनसाठी 2,179 कोटी मंजूर 

तसेच उपमुख्यमंत्री अजितदादाने त्यांचे 5-6 लोक परळीला पाठवावे. मग दादांना कळेल परळीत नेमकं काय सुरु आहे. तिकडे कोणत्या प्रकारे माणसांची हत्या होत आहे याची माहिती अजितदादांना मिळेल असं देखील सुरेश धस म्हणाले.

follow us