Download App

‘स्वतःच्या जिद्दीनं कमावलं अन्… राजकारणाच्या…; असा होता महादेव ताटके यांचा राजकीय प्रवास

Mahadev Tatke Political Career: सध्या महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) हे सोयीच म्हणून ओळखले जाते. परंतु राजकारणामध्ये अपयश आले की, माणसे कसे होत्याच नव्हतं होतात. त्याचचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेव ताटके. (Mahadev Tatke) राजकारणापायी कोट्यवधीच्या संपत्तीचा कचरा झाला आणि ते रस्त्यावर आले, राजकारणाच्या नादात या संपूर्ण आपलं अस्तित्व गमावून बसलेल्या माणसाची ही गोष्ट….चला तर मग नेमकं काय घडलं जाणून घ्या…

वाशिमच्या मंगरूळपीर येथील महादेव ताटके हे सध्या साधे जीवन जगत आहेत. त्या मागील विशेष कारण म्हणजे राजकारण. महादेव ताटके एकेकाळी सर्वात श्रीमंत समजले जाणारे व्यक्तिमत्व होते. उद्योग धंद्याच्या शोधात त्यांनी गाव सोडून थेट मुंबई गाठली. तसेच बांधकाम व्यवसायामध्ये त्यांनी मोठी भरारी घेतली आणि हजारो नाही लाखो नाही तर थेट करोडो रुपयांची कमाई करून त्यांनी आपलं नाव उंच शिखरावर नेहून ठेवलं होत. गरिबीची जान असणारे महादेव ताटके यांना समाजसेवा करायला खूप आवडायचं आणि त्यांनी मुंबई सोडून परत गावी आले. समाजकारण करत राजकारणाचा विचार सुरु केला आणि तिथेच त्यांच्या जीवनाच्या उलट्या प्रवासाला सुरुवात झाली.

विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय
-2009 ची विधानसभा निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
-त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना 75 मोटारसायकल भेट दिल्या.
-टाटा कंपनीची तीन चारचाकी वाहन ही वाटप केले.
-अन्नधान्य, खते, बी बियाणे, साड्या चोळीचे वाटप केले.
– दीड लाख वॉटर बॅगचेही वाटप त्यांनी केले.
-वर्तमान पत्रातून पान भरून जाहिराती देऊ लागले.
-मात्र 2009 ची विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला.

“कांदा निर्यातबंदी उठलीच नाही, फ्लेक्स लावून नुसतीच बनवाबनवी”; थोरातांचा विखेंना खोचक टोला

2009 ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 20 हजार 645 मतं मिळवत त्यांनी थेट तिसऱ्या क्रमांक गाठला. निवडणुकीच्या रिंगणात त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी होण्याच्या नादामध्ये त्यांनी आर्थिक ताळमेळ न साधता आल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती हातच्या बाहेर गेली. त्यांनी ज्यांना मदत केली तेच आता त्यांना बघून पाठ फिरवली आहे.

श्रीमंत आणि दानशूर असे व्यक्तिमत्व म्हणून ताटके यांची जिल्ह्यात चांगलीच ओळख निर्माण झाली होती. परंतु राजकारणात केलेल्या खर्चातून त्यांना सर्वच गोष्टी गमवावे लागले होते. कार्यकर्ते देखील त्यांच्यापासून खूप लांब झाले होते. ताटके यांनी ज्यांना मदत केली तेच आता त्यांना बघून पाठ फिरवताना पाहायला मिळतात. असे त्यांच्या ओळखीतील मदत करणाऱ्यांनी सांगितले आहे, अशी माहिती नंदलाल पवार यांनी दिली आहे.

follow us

संबंधित बातम्या