Download App

Dattatray Bharne : नव्या कृषीमंत्र्यांचा अजब सल्ला! ‘वाकडं करून परत सरळ करणारे, लक्षात राहतात…’

Dattatray Bharne Controversial Statment : राज्यातील विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झालेल्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्रिपदावरून (Agriculture Minister) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची जागा आता दत्तात्रय भरणे यांनी घेतली असून, त्यांच्याकडे राज्याच्या कृषी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण विभाग देण्यात आला आहे. मात्र, पदभार स्वीकारताच नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne Controversial Statment) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चांना तोंड फुटले आहे.

PM Kisan Yojana : गुडन्यूज! 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 2000 रुपये

कृषिमंत्र्यांचे अजब विधान

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भरणे यांनी म्हटले, सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्यांची माणसं नोंद ठेवतात. या वाक्यामुळे अनेकांनी डोळे वटारले तर काही (Pune News) अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, यावरून आता उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. महसूल विभागाकडून पारदर्शकतेची अपेक्षा असताना अशा प्रकारचे ‘मार्गदर्शन’ एका मंत्र्याकडून होणे योग्य ठरेल का? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

मोठी बातमी! अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची राजकीय संन्यास घेण्याची घोषणा

भरणे यांचे भावनिक वक्तव्य 

दत्तात्रय भरणे यांनी कृषिमंत्री पद स्वीकारल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना भावुक भाषाही वापरली. त्यांनी सांगितले, माझ्या वडिलांनी आणि चुलत भावानेही शेती केली आहे. जर ते दोघे हयात असते, तर आज मी कृषीमंत्री झाल्याचा त्यांना मोठा आनंद झाला असता. माझ्याकडे कृषी विभाग येणार असल्याची मला आधीच कुठलीही कल्पना नव्हती. मी शेतात फेरफटका मारत असताना ही गोष्ट कळली. ही जबाबदारी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशीच काम करण्याची माझी भूमिका आहे. फिल्डिंग लावली नाही, कार्यकर्त्यांची इच्छा होती की, मी कृषी मंत्री व्हावं. तीच इच्छा पूर्ण झाली.”

वादग्रस्त विधानामुळे अडचणी वाढणार?

दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात शेवटी शेतकऱ्यांच्या तक्रारी वेळेत सोडवण्याचा आणि योजनांचा लाभ गरजूंना पोहोचवण्याचा पुनरुच्चार केला असला, तरी त्यांच्या ‘वाकडं करून सरळ’ या विधानामुळे त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महसूल दिनासारख्या गंभीर प्रसंगी असे विधान करणे आणि तेही मंत्रिपदाच्या सुरुवातीलाच, यामुळे भरणे यांच्यासमोर स्पष्टीकरण देण्याची वेळ येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

 

follow us