Dattatray Bharne-Harshwardhan Patil यांच्या मतदारसंघातील नागरिकांना पुण्यातील पोटनिवडणुकीबद्दल काय वाटतं?

Dattatray Bharne-Harshwardhan Patil यांच्या मतदारसंघातील नागरिकांना पुण्यातील पोटनिवडणुकीबद्दल काय वाटतं?

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड या मतदार संघात (Kasba-Chinchwad Bypoll) लागलेल्या पोटनिवडणुकीची चर्चा राज्यात सुरु आहे. इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांच्या मतदार संघातील नागरिकांनीही या दोन्ही ठिकाणी कोणता उमेदवार निवडून यावा आणि त्यामागची कारणे सांगितली आहेत. तर या दोन्ही मतदार संघ पोटनिवडणुकीबद्दल इंदापूरच्या नागरिकांना काय वाटतंय हे जाणून घेणार आहोत.

इंदापूर तालुक्यातील कळसचे नागरिक विठ्ठल पाटील यांनी सांगितले की, भाजपने शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार आले पाहिजे. कसबा मतदार संघात कोण ताकतवर आहे हे तेथील जनता ठरवेल. मात्र, अजित पवार यांनी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे तोच निवडून आला पाहिजे. त्यातच महाराष्ट्राचे भलं आहे. माझ्या अंदाजानुसार कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हेच निवडून येतील.

तर इंदापूर तालुक्यातील बादलवाडीचे प्रवीण पाटील म्हणतात की, अजितदादा पवार यांचा पुण्यावर प्रभाव आहे. यापूर्वी तिथे भाजपचा उमेदवार निवडून आला असला तरी अजित दादांनी पाठिंबा दिलेला उमेदवारच निवडून येणार आहे.

इंदापूरचे काझडचे नागरिक बाळासाहेब पाटील यांच्या मतानुसार शहरात अजित पवार यांचा प्रभाव आहे. त्यामुळे कसब्यात काँग्रेसचा उमेदवार रवींद्र धंगेकर हे निवडून येतील. परंतु, चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे हे दोघेही उभे असल्याने मतांची विभागणी होण्याचा धोका आहे. त्याचा फटका नाना काटे यांना बसून तिथे भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या निवडून येतील, असे मला वाटते. तर तुळजापूर तालुक्यातील नागरिक शंकर पाटील म्हणतात, मला कारण माहिती नाही. पण कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube