Download App

शरद पवारांचे पंतप्रधानपद का हुकले ? ‘या’ ज्येष्ठ नेत्याने सांगितलं नेमकं कारण

Sharad Pawar News : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांकडून 2024 मधील लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपविरोधात विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न म्हणून या भेटीकडे पाहिले गेले. त्यानंतर आता राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने शरद पवार 2024 मध्ये पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकित वर्तवले आहे. तसेच शरद पवार आतापर्यंत पंतप्रधान का होऊ शकले नाहीत, याचेही कारण सांगितले आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) यांनी आज सोनई (ता. नेवासा) येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी गडाख यांनी हा दावा केला. ते म्हणाले, कदाचित 2024 नंतर परिस्थिती बदलली तर शरद पवार पंतप्रधानही होतील. शरद पवार यांची कारकीर्द आहे. त्यांच्याकडे वेगळीच ऊर्जा आहे. जनता हीच त्यांची ऊर्जा आहे. या वयात ते लोकांमध्ये जातात. फिरतात. दिल्लीत आजही त्यांचे वजन आहे, असे गौरवोद्गार गडाख यांनी काढले.

Video : ‘भाजपला नैतिकतेची शिकवणी पवार साहेबांसाठी कठीणच’.. फडणवीसांचा खोचक टोला

माझे मत शरद पवारांना

शरद पवार आतापर्यंत पंतप्रधान का होऊ शकले नाहीत, याचे कारणही त्यांनी सांगितले. दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडी आहे. दिल्लीतून नेहमीच त्यांच्या नावाचा विचार होत नव्हता. पी. व्ही. नरसिम्हाराव आणि शरद पवार यांच्यात निवडणूक झाली त्यावेळी मी माझे मत शरद पवार यांना दिले होते. मात्र, दिल्लीतील चौकडीमुळे पवार यांना पंतप्रधान होता आले नाही.

ते पुढे म्हणाले, मी माझ्या आयुष्यात अनेक प्रसंगांना तोंड दिले. तसेच उद्धव ठाकरेही आता देत आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे हे त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीवरून दिसून येत आहे. गद्दारांना तोंड देऊ शकत नाही असे म्हणत त्यांनी राजीनामा दिला. मात्र, राज्यातील जनता याला उत्तर देईल. 2024 मध्ये राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येईल. नागरिक महाविकास आघाडीलाच मतदान करतील, असा विश्वास गडाख यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाकरे-राऊतांचा अध्यक्षांना दम; फडणवीस म्हणाले, दबावाला बळी न पडता योग्य वेळी…

Tags

follow us