Video : ‘भाजपला नैतिकतेची शिकवणी पवार साहेबांसाठी कठीणच’.. फडणवीसांचा खोचक टोला

Video : ‘भाजपला नैतिकतेची शिकवणी पवार साहेबांसाठी कठीणच’.. फडणवीसांचा खोचक टोला

Sharad Pawar vs Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. या निकालामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे यांनी जसा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला तसाच राजीनामा आता शिंदे-फडणवीस सरकारने द्यावा, अशी मागणी होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी मिश्किल सवाल करत भाजप आणि नैतिकतेचा काय संबंध, असे म्हटले होते. त्यांच्या या टीकेवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना या मुद्द्यावर विचारले. त्यावर फडणवीस यांनी प्रतिप्रश्न करत म्हटले की मग पवार साहेबांचा आणि नैतिकतेचा संबंध आहे का ?, आता जर पवार साहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर मग कठीणच जाईल. त्यासाठी इतिहासात जावे लागेल  वसंतदादांचं सरकार कसं गेलं ? इथपासून सुरुवात होईल, जाऊ द्या. ठीक आहे ज्येष्ठ नेते आहेत. बोलत असतात फार लक्ष द्यायचं नसतं, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.

‘तो’ निर्णय घ्यावाच लागणार, नाहीतर त्यांना कळेल… राऊतांनी भरला दम

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही त्यांनी भाष्य केले. न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सर्व अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. त्यासाठी वेळही सांगण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर स्पीकरवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते फ्री अँड फेअर प्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की स्पीकर कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडतील. सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष निष्णात वकील आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे जे कायद्यात आणि संविधानात आहे आणि जे सुप्रीम सांगितले आहे त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष योग्य वेळी योग्य निर्णय करतील.

नैतिकतेचा अधिकार ठाकरेंना नाही 

नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकार नाही. मोदींचे फोटो लावून निवडून आले. नंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीकरता विचार सोडला, नैतिकता सोडली ते कोणत्या तोंडाने नैतिकतेच्या गोष्टी करतात हे मलाच कळत नाही, अशी टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. उद्धव ठाकरे दावा करत आहेत की न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने आला आहे यावर विचारले असता फडणवीस म्हणाले, त्यांना जर तसे वाटत असेल तर त्यांनी ढोल बडवावेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube