Download App

अजित पवारांचा एक फोन अन् उमेदवाराच्या नावाची घोषणा; रामराजे नाईक निंबाळकरांना हसू अवरेना

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशी उमेदवारी जाहीर होण्याकडे सर्वच पक्ष वळले आहेत. अजित पवारांनी घोषणा केली.

  • Written By: Last Updated:

 Ajit Pawar Announced by Deepak Chavan Candidature : साताऱ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहता आले नाहीत. मात्र, त्यांनी सभेतील नागरिकांसोबत फोनवरून संवाद साधत आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवारीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

फोनवरून उमेदवारी

अजित पवार यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळक यांना फोन करुन दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. फलटण हा अनूसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून यापूर्वी तीन टर्ममध्ये दीपक चव्हाण निवडून आले आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांची सोळशीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली.

मोठी बातमी! अजित पवारांना धक्का बसणार?, आमदार बबन शिंदे अन् रवी लांडे शरद पवारांच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. निंबाळकर कुटुंबानं उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष वाढलेला आहे. यापार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान थेट अजित दादा पवार यांनी फोन द्वारे दिपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वच जण अचंबित झाले आहेत. नावाची घोषणा करताच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य उमटलं.

रक्षाबंधनाची ओवाळणी

दीपक चव्हाण यांना आशीर्वाद द्यावेत, त्यांना सहकार्य करावं, असं अजित पवार म्हणाले. दीपक चव्हाण यांना संधी दिल्यानंतर जिल्ह्यासाठी लागणारा करोडो रुपयांचा निधी देईन. कोट्यवधी रुपयांचा निधी फलटण, कोरेगाव तालुक्याला मिळेल. माझ्या बोलण्यावर माझ्या मायमाऊल्यांनी विश्वास ठेवावा. तिकडं गेल्यावर महिला, मायमाऊली राख्या बांधतात. रक्षाबंधनाची ओवाळणी दिलेली आहे. नवरात्री येणार आहे, पुढं दसरा, दिवाळी येणार आहे. त्याची भाऊबीजेची ओवाळणी दिल्याशिवाय तुमचा भाऊ गप्प बसणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.

follow us

संबंधित बातम्या