Maharashtra Assembly Election 2024 : नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा मतदारसंघातील भाऊबंदकीचा वाद समोर यायला लागला आहे. भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी माझा विश्वासघात केला आहे. जो भावाचा नाही झाला तो जनतेचा काय होणार? अशा शब्दांत केदा आहेर यांनी भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यावर टीका केली आहे. नाशिकच्या चांदवड येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात त्यांनी जनतेच्या आशिर्वादावर निवडणूक लढवणार असं जाहीर केलं आहे. केदा आहेरांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाशिकच्या देवळ्यात, नगराध्यक्ष, उपनगरध्यक्षांसह देवळा नगरपंचायतीच्या 15 नगरसेवकांचा राजीनामा दिला आहे.
जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे होती. माझ्या जीवावर त्यांनी दोन वेळेला आमदारकी भोगली, आता सन्मानाने बाजूला व्हायला पाहिजे होतं. मात्र, त्यांनी माझ्याशी गद्दारी केल्याचाही आरोपही केदा आहेर यांनी केला. राजकारणाच्या पलीकडे देखील भाऊबंदकी, परिवार, कुटुंब असते. पाच वर्ष कसायला जमीन दिली तर हा म्हणतो मााझ्याच नावावर सातबार आहे, काही न्यायनीती आहे की नाही? असं देखील केदा आहेर म्हणाले आहेत.
लोकसभेचा राडा विधानसभेला चालणार नाही; धनंजय मुंडेच्या मतदारसंघात न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
मी आज जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. देवळा येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मी देवळाकरांचे म्हणणे ऐकणार आहे. तसंच, माझी भूमिका मांडणार आहे. ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. मी खुर्चीसाठी लाचार नाही. मी अनेक नगरसेवक, सभापती, उपसभापती, आमदार केले. स्वत:ला कोणी मोठे समजू नका, आपण जनतेचे सेवक आहोत. ही जनता डोक्यावर पण घेते आणि पायाखाली देखील तुडवते, अशी टीका देखील केली आहे.
माझ्या भावनेशी खेळले
केदा आहेर म्हणाले, 17 तारखेला पत्रकार परिषद घेतली. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीचा निर्णय 16 सप्टेंबरलाच दिल्लीत झाला होता. मला वेड्यात काढलं. माझ्या भावनेशी खेळले. जनतेसाठी 10 वर्ष मी राबलो. मला भावना आहे, मी पण माणूस आहे. मेळाव्यात पुढील दिशा ठरवणार आहे. केदा आहेरांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाशिकच्या देवळ्यात, नगराध्यक्ष, उपनगरध्यक्षांसह देवळा नगरपंचायतीच्या 15 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.
याआधीच राजीनामा दिला
केदा आहेर बंडखोरीच्या पवित्र्यात आहे. नगराध्यक्ष, उपनगरध्यक्षांसह देवळा नगरपंचायतीच्या 15 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. केदा आहेर यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने देवळ्यात राजीनामा सत्र सुरू आहे. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण, महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष बबिता देवरे यांनी याआधीच राजीनामा दिला. चांदवड – देवळा मतदारसंघाची भाजप उमेदवारी पुन्हा डॉ.राहुल आहेर यांना मिळाल्याने केदा आहेर समर्थक नाराज आहेत. भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाराज केदा आहेर बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात आहे.