Download App

राज ठाकरेंची महायुतीसोबत जाण्याबद्दल ‘मन की बात’, म्हणाले, मी पूर्वीपासून भाजपसोबत…

या सगळ्या वातावरणात राज ठाकरेंकडून उमेदवारांसाठी सभांचा धडाका सुरू असून मुंबईतील माहीम मतदारसंघात त्यांनी आपला पुत्र अमित ठाकरे

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray : मनसेने मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले आहेत. तसंच, निवडणूक निकालानंतर यंदा मनसे हा सत्तेतील पक्ष असेल, असा विश्वासही राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे. (Raj Thackeray) त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला किती जागा जिंकता येतील, मनसे किती जागांवर विजय मिळवेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

या सगळ्या वातावरणात राज ठाकरेंकडून उमेदवारांसाठी सभांचा धडाका सुरू असून मुंबईतील माहीम मतदारसंघात त्यांनी आपला पुत्र अमित ठाकरे यांनाही विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणूक आणखी रंगतदार बनली आहे. त्यातच, एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी भाजपसोबत कंम्फर्टेबल आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्याअगोदर त्यांनी पार्श्वभूमी समजावून सांगताना भाजपच्या जुन्या दिग्गज व काही दिवंगत नेत्यांची नावी घेत, त्यांच्यापासून माझे भाजप नेत्यांशी जवळचे संबध राहिल्याचंही ते म्हणाले आहेत.

Assembly Election: चिंचवडमध्ये भाजपला धक्का; अंबरनाथ कांबळेंची राहुल कलाटेंना साथ

महायुती किंवा आघाडीचे तुम्ही गेल्या 10 ते 15 वर्षांपासूनचे जाहीरनामे काढून पाहा. निवडणूक काळातील आजच्या जाहीरनाम्यात त्यांनी जे आश्वासन दिले आहेत, तेच आश्वासन यापूर्वीही दिले आहेत. मी तेवढं बोलतो, जे शक्य आहे. जे मी करू शकतो त्या गोष्टी मी भाषणातून बोलत आहेत, पण यांच्याकडून गेल्या 10 ते 15 वर्षांपासूनचं तेच तेच सांगण्यात येत आहे. जर 10 ते 15 वर्षांपासून त्याच गोष्टी तुम्ही सांगत असाल तर त्या अडचणी आत्तापर्यंत का संपुष्टात आल्या नाहीत, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

जर विषय भाजपचा असेल तर, सुरुवातीपासूनच मी जेव्हा शिवसेनेत होतो, तेव्हापासून माझा पक्ष काढल्यानंतरही माझे चांगले संबंध कोणाशी राहिले तर ते भाजपासोबत. प्रमोद महाजन, गोपीनाथराव, नितीनजी असतील किंवा अटलजी असतील, अडवाणीजी असतील या सर्वच नेत्यांसोबत माझे सुरुवातीपासून संबंध आले, ते भाजप नेत्यांसोबतच. माझे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत कधी जवळचे संबंध आले नाहीत. त्यामुळे, आपल्यासाठी एक कम्फर्ट झोन असतो, मला वाटतं भाजपसोबत मी पहिल्यापासून कम्फर्टेबल आहे असंही ते म्हणाले आहेत.

follow us