Assembly Election: चिंचवडमध्ये भाजपला धक्का; अंबरनाथ कांबळेंची राहुल कलाटेंना साथ
Chinchwad Assembly constituency: चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad Assembly constituency) आजचा राजकीय दिवस गाजला तो जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या रोड शोने. चिंचवडमध्ये रोड शोची सांगता करतांना शरद पवारांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी नवी सांगवी भागातील भाजपचे नगरसेवक पहिलवान अंबरनाथ कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
पुढील पिढीला सत्याची शिकवण द्यायची असेल, तर सत्तापरिवर्तन करावं लागेल; राहुल कलाटे
कांबळे यांच्यासह संतोष जाधव, सचिन कुळपकर, प्रविण देवासी, हनुमंत मारकड, दीपक पोटे, मयूर जाधव या भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसेच वंचितचे सुमित भोसले यांनी तुतारी हाती घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. शरद पवारांच्या सभेवेळी चिंचवड विधानसभेत कार्यरत असलेल्या मराठवाडा जनविकास संघ, छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य, पँथर आर्मी, बहुजन व्यासपीठ, धनगर समाज महासंघ या संघटनांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना जाहीर पाठिंबा दिला.
चिंचवडचा विकास हवा असेल तर ‘सत्ता परिवर्तन’ करावेच लागेल, असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांना विधानसभेसाठी संधी देण्याचे आवाहन खासदार शरद पवार यांनी केली. गुरुवारी वाल्हेकरवाडी येथे सभा झाली. यावेळी उमेदवार राहुल कलाटे, माजी खासदार विदुरा उर्फ नाना नवले, कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे, पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, नवनाथ जगताप, मयुर कलाटे, सुनील गव्हाणे, शिवसेना (उबाठा)चे संजोग वाघेरे, कैलास कदम, इम्रान शेख, वंचितचे सुमित भोसले, तुकाराम भोंडवे, गणेश भोंडवे, नवनाथ जगताप, मयूर कलाटे, मच्छिंद्र तापकीर, संपत पवार, देवेंद्र तायडे, सायली नढे, ज्योती निंबाळकर, अनिता तुतारे, वैशाली मराठे, सागर तापकीर, कौस्तुभ नवले, स्वप्निल बनसोडे आदी उपस्थित होते.