Download App

डॉ. आंबेडकरांचा फोटो लावण्यावरून विधानसभेत गदारोळ; अजित पवार का संतापले?

जर विरोधकांना आपल्या बाकासमोर बाबासाहेबांचा फोटो लावण्याची परवानगी मिळणार असेल तर ती आम्हालाही मिळाली पाहिजे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Legislative Assembly Winter Session 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवरून महाराष्ट्र विधानसभेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. गेली चार दिवसांपासून देशभरात आंबेडकरांच्या नावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र विधानसभा सभागृहात विरोधकांनी (Winter Session) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या फोटोवरून विधानसभा अध्यक्षांना चांगलच सुनावलं.

बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम; गृहमंत्री शाहांच्या त्या वक्तव्यावर आठवलेंची प्रतिक्रिया

जर विरोधकांना आपल्या बाकासमोर बाबासाहेबांचा फोटो लावण्याची परवानगी मिळणार असेल तर ती आम्हालाही मिळाली पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचा आदर करतो. त्यामुळे बाबासाहेबांचे फोटो फक्त विरोधकांच्याच बाजूला का? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी हे फोटो आमच्याही बाजुला लावण्याची परवानगी मागितली. त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले बोलण्यासाठी उभा राहिले. त्यावेळी मोठा गदारोळ झाला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी 10 मिनीटांसाठी सभागृह स्थगित केलं.

विधानसभेत नेमकं काय घडलं?

विधानसभेचे कामकाज नियमितपणे चालू झाले. मात्र सभागृहाचे कामकाज चालू होताच विरोधकांनी आपापल्या बाकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले. अमित शाहा यांनी डॉ. आंबेडकरांना केलेल्या विधानाचा निषेध म्हणून विरोधकांनी हे फोटो लावले होते.

आमच्या बाजूनेही लावावेत

विरोधकांच्या बाकावर आंबेडकरांचे फोटो पाहताच उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक झाले. अजित पवार त्यांनी उभे राहून विधानभा अध्यक्षांना उद्देशून बाबासाहेब यांच्यावर आमचाही अधिकार आहे. त्यामुळे ⁠तुम्ही काही ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावण्यास परवानगी दिली आहे. आंबेडकरांचे फोटो आमच्या बाजूनेही लावावेत. तशी परवानगी आम्हाला द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

महापुरुषांचे फोटो लावण्याची परवानगी नाही- राहुल नार्वेकर
अजित पवार यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी मी अशा प्रकारची कोणतीही परवानगी दिलेली नाही. ⁠दैवत किंवा महापुरुषांचे फोटो लावण्याची परवानगी नाही. ⁠या सभागृहाची परंपरा राखली पाहिजे, असे आवाहन करून विधानसभा अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो काढण्याचे आवाहन केले.

follow us

संबंधित बातम्या