Download App

2023 चे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार अन् तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Maharashtra Award : संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार (Maharashtra Award) सन 2023 आणि राज्य शासनाच्या वतीने तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणा-या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

आंबेडकरांमुळेच 2019 ला आमचे 9 खासदार पराभूत, यावेळी त्यांनी…; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टचं सांगितलं

यावर्षी हे पुरस्कार अनुक्रमे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना तर तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कलावंत हिराबाई कांबळे आणि अशोक पेठकर यांना जाहीर झाला आहे. या तिन्ही पुरस्कारार्थींचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

दावोसच्या खर्चावरून ठाकरेंनी शिंदेना घेरले ! आता सुप्रिया सुळेंची वादात उडी

राज्य शासनाने संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन 2023 आणि राज्य शासनाच्या वतीने तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणा-या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांसाठी समिती गठीत केली होती. या निवड समितीने हा निर्णय घेतला.पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने आज (दि. 15 जानेवारी) याबाबतचा शासन आदेश जारी केला. त्यामध्ये ही घोषणा करण्यात आली.

follow us

संबंधित बातम्या