दावोसच्या खर्चावरून ठाकरेंनी शिंदेना घेरले ! आता सुप्रिया सुळेंची वादात उडी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिष्टमंडळ हे राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर जात आहे. पण या दौऱ्याच्या खर्चावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी खर्चावरून व शिष्टमंडळात असलेल्या व्यक्तींवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घेरले आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही उडी घेतली आहे.
दावोस दौऱ्यासाठी ७० जणांचे शिष्टमंडळ जात आहे. यामध्ये अधिकारी, पीए, ओएसडी, लहान मुले यांचा समावेश आहे. यासाठी तब्बल ३४ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हि जनतेच्या पैशांची खुलेआम लूट आहे. एकीकडे अहोरात्र कष्ट करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तोलून धरणाऱ्या अंगणवाडी भगिनी आपल्या…
— Supriya Sule (@supriya_sule) January 15, 2024
हंसराज अहिर यांनी जुनी जखम उघडी केली… टेन्शन सुधीर मुनगंटिवारांना!
दावोस दौऱ्यासाठी ७० जणांचे शिष्टमंडळ जात आहे. यामध्ये अधिकारी, पीए, ओएसडी, लहान मुले यांचा समावेश आहे. यासाठी तब्बल ३४ कोटी रुपये खर्च केले जातायात. ही जनतेच्या पैशांची खुलेआम लूट असल्याचा आरोपही सुळे यांनी केला आहे. एकीकडे अहोरात्र कष्ट करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तोलून धरणाऱ्या अंगणवाडी भगिनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. तर दुसरीकडे मात्र कोट्यवधी रुपये सहलीसाठी उधळले जात आहेत. ही मोठी गंभीर बाब आहे. या उधळपट्टीचा मी निषेध करतेय, असे सुळे यांनी म्हटले आहे. शासनाने आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवून पैशांचा योग्य विनियोग कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
“माझी पिट्या… माझी पिट्या…” : धनंजय मुंडेंना आले प्रेमाचे भरते! नेमके गुपित काय?
आदित्य ठाकरेंनी कसे घेरले ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप करत पुन्हा 50 खोकांवरही डिवचले आहे. आधी ५० खोके होते. आता 50 लोक घेऊन मुख्यमंत्री दावोसला जात आहे. त्यात एका खासदाराचा समावेश आहे. एका माजी खासदाराचा समावेश आहे. आता गद्दारी करणाऱ्यांना सोबत नेत आहेत. काही दलालही सोबत नेण्यात येत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.