Badlapur News : बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील लैंगिक अत्याचाराच्या (Badlapur Crime) घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापुरात आंदोलन सुरू आहे. संतप्त झालेल्या आंदोलकांना रेल्वे रुळावर उतरून आंदोलन सुरू केले. यामुळे येथील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आरोपीला फाशी द्या अन्यथा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. मागील चार तासांपासून आंदोलन सुरू होते. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटवण्यासाठी पोलिसांनी (Maharashtra) सौम्य लाठीचार्ज केला. यामुळे आणखीच संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
बदलापूर शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री शिंदे अन् गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले?
या अत्याचाराच्या घटनेने प्रत्येकाचाच भडका (Indian Railway) उडाला आहे. रेल्वे परिसरातील आंदोलन चिघळल्यानंतर दुसरीकडे शाळेचे गेट तोडून आंदोलक आत घुसले. येथे त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पालकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी शाळेबाहेर जोरदार शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी शाळेच्या आत घुसून नासधूस करण्यास सुरुवात केली. शाळेतील आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा मारा केल्याची माहिती मिळाली आहे.
देवेंद्र फडणवीस ह्यांनी बदलापूर मधील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले परिणामी आंदोलक आणि पोलीस ह्यांच्यात जोरदार दगडफेक झाली. @Dev_Fadnavis आंदोलन दडपण्याची ही कुठली पद्धत नक्की? pic.twitter.com/0mlxkNVjaj
— Ajay Munde🗝️ (@ajaymunde) August 20, 2024
या घटनेनंतर बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारनेही कारवाईस सुरुवात केली आहे. या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. शाळेनेही माफीनामा सादर केला आहे. शाळेतील मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. मुलांची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. सजग नागरिकांनी या शाळेविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाईस सुरुवात केली आहे.
Badlapur Crime : गृहमंत्री मनसेचा असता तर जागेवर एन्काऊण्टर केला असता; मनसेचा संताप