ही तर जाळी लागलेली अडगळ, नेमाडेंनी माफी मागावी; भाजपची मागणी

BJP On Bhalchandra Nemade :  औरंगाबाद (Aurangabad)आणि उस्मानाबाद (Osmanabad)या शहरांचं नामांतरावरुन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)यांनी राज्य सरकारवर  जोरदार निशाणा साधला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र आहेत. त्यातून काहीच साध्य होणार नाही, असे नेमाडेंनी म्हटले होते. यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. केवळ “हिंदू “कादंबरी लिहून उपयोगाचे नाही. तुम्ही समृद्ध […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 26T162134.377

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 26T162134.377

BJP On Bhalchandra Nemade :  औरंगाबाद (Aurangabad)आणि उस्मानाबाद (Osmanabad)या शहरांचं नामांतरावरुन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)यांनी राज्य सरकारवर  जोरदार निशाणा साधला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र आहेत. त्यातून काहीच साध्य होणार नाही, असे नेमाडेंनी म्हटले होते. यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. केवळ “हिंदू “कादंबरी लिहून उपयोगाचे नाही. तुम्ही समृद्ध नव्हे, तर जाळी लागलेली ‘अडगळ ‘आहात हे सिद्धच केले आहे, असे म्हणत भाजपने ट्विटरवरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांची नावे बदलणारे लोक क्षुद्र आहेत. “असा शोध ज्ञानपीठ विजेते लेखक प्रा. भालचंद्र नेमाडे यांनी लावून समस्त मराठी जनांचा, मनाचा आणि त्यांच्या भावनांचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजीनगर हे केवळ नाव नसून आमच्यासाठी श्वास आहे, असे भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://letsupp.com/maharashtra/maharashtra-water-conservation-scheme-39212.html

तसेच केवळ “हिंदू “कादंबरी लिहून उपयोगाचे नाही. तुम्ही समृद्ध नव्हे, तर जाळी लागलेली ‘अडगळ ‘आहात हे सिद्धच केले.आयुष्याचा होम करणारी पिढी शिवरायांच्या या महाराष्ट्राने बघितली, तेंव्हा कुठे नामांतर झाले. हाही इतिहास वाचा जरा, असे म्हणत नेमाडेंना सुनावले आहे.

एवढ्यावरच न थांबता नेमाडेंनी माफी मागावी, असेही भाजपने म्हटले आहे.  नेमाडेजी, शूद्र कोणाला म्हणता? शिंदे-फडणवीस सरकारने नामांतराचा हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या घटनादत्त मंत्रिमंडळाला तुम्ही क्षुद्र म्हणाले. धर्मवीरांचा, मंत्रिमंडळाचा अपमान तुम्ही केला. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. माफी मागा, त्याशिवाय तरणोपाय नाही, असे नेमाडेंना म्हणण्यात आले आहे.

काय म्हणाले होते नेमाडे :

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नाव बदलणारे लोक क्षुद्र आहेत. यातून काहीच साध्य होणार नाही. हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती ज्याप्रमाणे नष्ट झाली, तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली आहे, असे भालचंद्र नेमाडेंनी म्हटले होते. देशामध्ये लोकशाही धोक्यात आली असून खरं बोलणाऱ्याला पोलीस संरक्षणामध्ये फिरावं लागत असल्याचं परखड मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं होतं.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद

Exit mobile version