नसरापूर प्रकरणात न्याय आता संतोष देशमुखांच्या आरोपींना शिक्षा द्या
Manoj Jarange On Nasarpur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने
Manoj Jarange On Nasarpur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने 65 वर्षीय भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन महिन्यांपूर्वी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत तात्काळ आरोपीला अटक केली होती. यानंतर राज्य सरकारने हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला होता. तर आज या प्रकरणाचा पुणे सत्र न्यायालायने निकाल दिला असून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या निकालानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रतिक्रिया देत निकालाचे स्वागत केले आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh Case) देखील आरोपीला शिक्षा देण्यात यावी अशी मागणी माध्यमांशी बोलतान केली आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री साहेबांचे कौतुक केले पाहिजे, त्यांनी तत्परता दाखवली आणि दोन महिन्यात आरोपीला (Bhimrao Kamble) शिक्षा झाली. असाच नियम संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा लावायला पाहिजे. मालेगाव येथील 3 वर्षीय मुलीच्या प्रकरणात सुद्ध हेच केलं पाहिजे असं माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले.
तसेच आरोपीला फाशी झाली तर नसरापुरच्या कुटुंबाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळाला. आता, संतोष देशमुख, महादेव मुंडे, मालेगाव या प्रकरणातही तोच नियम लावायला पाहिजे असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तर दुसरीकडे नसरापूर हत्या आणि अत्याचार प्रकरणात न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी असल्याचे म्हणत न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं आहे. फास्ट ट्रॅक न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली आहे.