Download App

‘एक दिल टुकडे हजार, कोई कहाँ गिरा’.. बावनकुळेंनी शायराना अंदाजात केलं महाविकासआघाडीचं भाकीत

Chandrashekhar Bawankule : राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. सत्ताधारी विरोधकांकडून जागावाटप, मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्याला हवा देण्याचे काम विरोधकांकडून केले गेले. या पार्श्वभुमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट मत व्यक्त करत महाविकास आघाडीवर टीका केली.

बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप-सेना युतीचं केंद्रीय बोर्ड ठरवतं. स्थानिक पातळीवर कुणालाच काही अधिकार नाही. शिंदे फडणवीस यांची चर्चा होईल. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल त्यानंतरच आमचा जागावाटपाचा निर्णय होईल.

‘त्या’ प्रकारांनंतर भाजपाचेही डॅमेज कंट्रोल; बावनकुळेंची कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना तंबी

आता राहिला प्रश्न विरोधी पक्षांच्या निवडणूक लढण्याचा तर त्यांच्याकडे रोजच दावे प्रतिदावे होत आहेत. कुणी विदर्भात जाऊन बैठका घेतंय तर कुणी मराठवाड्यात जाऊन बैठका घेतंय, कुणी चाचपणी करतं तर कुणी काही करतं. महाविकास आघाडीत शेवटच्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण होणार की एक दिल टुकडे हुए हजार, कोई कहाँ गिरा, कोई कहाँ गिरा ही जी म्हण आहे याप्रमाणे त्यांची अवस्था होणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

खरंतर त्यांच्यात काहीच समन्वय नाही. फक्त सत्तेसाठीच ते एकत्र आले आहेत. विचारधारेने ते एकत्र नाहीत. काँग्रेसची विचारधारा राष्ट्रवादीला पटत नाही जर पटत असती तर पवार साहेबांनी राष्ट्रवादी कशाला बनवली असती, असा सवाल बावनकुळे यांनी केला.

राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसच्या विचाराला दूर सारून बनला आहे. नाहीतर पवार साहेबांनी हे स्पष्ट करावं की काँग्रेस का सोडली? या दोघांचा विचार आणि उद्धव ठाकरेंचा विचार वेगळा आहे. तरी उद्धव ठाकरेंनी त्यांचा विचार काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला आहे. पण, शिवसेनेची विचारधारा हिंदुत्वाची आहे. मूळ विचारधारा शिवसैनिकांची वेगळी आहे. विचारधारा न जुळणारे जे लोक एकत्र येतात ते काही काळापुरते असतात, असा टोला बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला लगावला.

संजय राऊतांनी धमकीचा बनाव रचला? नितेश राणेंनी फोटोसहित केली चिरफाड

त्यांचा फडणवीसांना बदनाम करण्याचा डाव 

सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. गृहखातं ज्या पद्धतीने काम करत आहे. ड्रग प्रकरणात अडकलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात शोधतंय, अवैध धंद्यांवर कारवाई केली जात आहे. जिल्ह्याजिल्ह्यातले अवैध धंदे बंद होत आहेत. मोठे मासे पकडले जात आहेत. म्हणून फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी वेगवेगळे प्रकरणे तयार केले जात असल्याचे माझे मत आहे, असे बावनकुळे म्हणाले.

 

Tags

follow us