‘त्या’ प्रकारांनंतर भाजपाचेही डॅमेज कंट्रोल; बावनकुळेंची कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना तंबी

‘त्या’ प्रकारांनंतर भाजपाचेही डॅमेज कंट्रोल; बावनकुळेंची कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना तंबी

Chandrashekhar Bawankule : शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून जोरदार वाद पेटला आहे. शिंदे गटाचे नेते आणि भाजपात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. काल तर भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून केली होती. ही टीका शिंदे गटाच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली. दुसरीकडे आज उल्हासनगरात शिंदे गटाला डिवचणारे फलक भाजप कार्यकर्त्यांनी लावले. यानंतर भाजपकडूनही डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कितीही काही झाले तरी भाजप सेना युती ही अभेद्य आहे. भाजपचा अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांना सूचना दिल्या आहेत की कुणीही उतावीळपणा करू नये. कुणीही बॅनरबाजी, पोस्टरबाजी करू नये. कुणीही प्रदेशची परवानगी घेतल्याशिवाय भाजप-शिवसेना युतीबद्दल बोलू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंकडून दंगली घडवण्याचं कारस्थान; नितेश राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

बीआरएसला आमच्या शुभेच्छा

भाजपचा एकही कार्यकर्ता भारत राष्ट्र समिती पक्षात जाणार नाही. त्या पक्षात प्रवेशही करणार नाही. त्यांचा पक्ष वाढविण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी सुरुवात केली त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

चौकशी करणे मुख्यमंत्र्यांचे काम

कृषी विभागात घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, राज्य सरकारच्या कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाले असतील तर त्यांची चौकशी करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. मुख्यमंत्री ते तपासतील त्यांना तो अधिकार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्यावर आरोप झाले असतील तर त्याची चौकशी मुख्यमंत्री करतील, असे बावनकुळे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube