महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंकडून दंगली घडवण्याचं कारस्थान; नितेश राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंकडून दंगली घडवण्याचं कारस्थान; नितेश राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Nitesh Rane On Uddhav Thackeray : भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane)यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याकडून नेहमीच विरोधकांवर हल्लाबोल केला जातो. नितेश राणे प्रामुख्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर निशाणा साधतात. त्याचबरोबर ते लव जिहाद, धर्मांतरण यासारख्या मुद्द्यांवर देखील आक्रमक पवित्रा घेतलेले पाहायला मिळतात. अशाच परखड नितेश राणेंची लेट्सअप मराठीने लेट्सअप सभामध्ये स्फोटक मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी लव जिहाद, धर्मांतरण, शिवसेना आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) या व यासारख्या विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपली परखड भूमिका मांडली. त्याचवेळी नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर दंगल घडवत असल्याचा आरोप केला होता, त्यावर राणे यांनी स्पष्ट शब्दात मातोश्रीमध्ये घडलेला किस्सा सांगितला आहे. (nitesh-rane-on-uddhav-thackeray-accused-of-rioting)

Nitesh Rane on Sanjay Raut : …म्हणून मी पातळी सोडून बोलतो; राणेंनी सांगितली राऊतांविरोधातील युद्धनीती

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे दंगली घडवण्याचं काम करत आहेत, अशा प्रकारचा आरोप केला होता, तो नेमका कोणत्या आधारावर केला असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर आमदार नितेश राणे यांनी सागितले की, 13 ऑगस्ट 2004 या दिवशी मातोश्रीमध्ये एक बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत ते आजही खासदार आहेत पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, ते त्या बैठकीला होते. आणि अरुण बेतकेकर नावाचे माजी सरचिटणीस त्या बैठकीला बोलवले होते.

Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात सगळी तयारी झालीये; राणेंनी सांगितला भाजपचा इनसाईड प्लॅन

त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी तीथं स्पष्ट सांगितलं होतं की, 1992-93 च्या हिंदू-मुस्लिम दंगलीनंतरच 1995 ला शिवसेनेची सत्ता आली. हिंदू-मुस्लिम केल्यानंतरच शिवसेनेची सत्ता आली. मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. म्हणून त्यांना सांगितलं की, तुम्हाला मी आदेश देतो की, चरणी रोड या भागातील जे काही मुस्लिम फेरीवाले आहेत त्यांच्यावर जाऊन हल्ले करा, त्यांच्यावर चाकू हल्ले करा, वार करा आणि मग हिंदू-मुस्लिमांची दंगल होऊद्या, ती दंगल पेटवायची कशी हे तुम्ही माझ्यावर सोडा असे त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, असा थेट आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, मी तुम्हाला पाहिजे असेल तर अरुण बेतकेकर यांचा फोन नंबर देतो, तुम्ही त्यांची मुलाखत घ्या, त्यांना विचारा असंही स्पष्टपणे सांगितलंय. हे मी आपल्याला तसच्या तसं सांगत आहे. या बैठकीला जे काही नेते उपस्थित होते, ते या गोष्टी नाकारु शकत नसल्याचेही नितेश राणे यांनी सांगितलं आहे.

मी अतिशय जबाबदारीने अरुण बेतकेकर ते संबंधित खासदार आणि उद्धव ठाकरे या तिघात मातोश्रीमध्ये ही बैठक झाली होती. 13 ऑगस्ट 2004 तारीख पण मी तुम्हाला देतो, तिथं जी उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली तीच मी आत्ता तुम्हाला सांगितली, असंही राणे म्हणाले.

आज उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आहेत, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. 2024 ला आपल्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात, आत्ता उद्धव ठाकरेंना आपला पक्ष मोठा करायचा आहे आणि परत मुख्यमंत्री व्हायचं आहे, म्हणून त्याच पद्धतीनं प्लॅन असू शकतो, असा आरोपही यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.

एवढ्या वर्षांपासून डोक्यात असलेला प्लॅन बदलत नाही. एकदा विचार आला 2004 ला,परत तो प्लॅन केला जाऊ शकतो, ज्या पद्धतीने गेल्या दहा ते अकरा महिण्यांमध्ये सातत्याने दंगल भडकवली जाते, पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळे त्या दंगली मोठ्या होत नाहीत. कारण गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते बरोबर कंट्रोल करतात, आणि कोणी त्याच्यानंतर हिंमत पण करत नाही, कारण कारवायाच एवढ्या फास्ट होतात ना, त्यामुळे कोणाचीच हिंमत होत नाही, दंगल मोठी करण्याची, पण उद्धव ठाकरेंच्या सुपिक डोक्यामधून आलेलं आहे आणि ही सत्य घटना असल्याचेही यावेळी ठणकावून सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube