Download App

Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता फक्त एक रुपयांत मिळणार पीकविमा

Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयात पीक विमा मिळणार आहे. विमा हप्त्याची रक्कम अतिशय कमी केल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जाईल. आता शेतकऱ्यांवर कोणताच भार राहणार नाही. राज्य सरकारचा विमा हप्ता भरणार आहे. शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीकविमा मिळणार आहे. 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : Maharashtra Economic Survey 2022-23 : राज्याचा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल सादर; जाणून घ्या यात नेमकं काय?

राज्य सरकारने यंदा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक भरीव घोषणा केल्याचे दिसत आहे. पीकविम्याप्रमाणेच वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा, दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ देणार.

Maharashtra Budget Session : एकनाथ खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये सभागृहातच खडाजंगी

प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रलंबित 86 हजार 073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी देण्यात येणार आहे. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=gDpNv62k1fg

Tags

follow us