Download App

रेल्वे, रस्त्यांच्या प्रकल्पांसाठी अजितदादांकडून भरघोस निधी; नवे प्रकल्पही घोषित

Maharashtra Budget LIVE : राज्य सरकारचं अंतरिम बजेट अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून विधी मंडळात सादर करण्यात येत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी राज्यातील रेल्वे, रस्त्यांसह इतर प्रकल्पांना भरघोस निधी देण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार विधी मंडळात नवनवीन घोषणा करीत आहेत.

“साहेब समजून घ्या, मी नुसता मिरवणारा नाही तर”.. वसंत मोरेंनी अमित ठाकरेंना काय सांगितलं ?

अजितदादांनी कोणत्या घोषणा केल्या?
7 हजार किमी रस्त्यांची कामं, वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत नेणार
शिवनेरी या ठिकाणी ११ गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला.
7 हजार 500 किमी ची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार
सार्वजनिक बांधकाम 19 हजार कोटी रुपये देण्यात येणार
भारतातील पहिली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव तेथे रेल्वे मार्गासाठी भुसंपादन सूरू
जालना-यवतमाळ-पुणे-लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम देणार
रत्नागिरी-भागवत बंदरासाठी 300 कोटी रुपयांची घोषणा
मिरकरवाडा बंदर नव्याने कऱण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी अर्थिक तरतूद
अमरावतीच्या वेल्लोरा येथे रात्रीचे विमान उतरण्यासाठी काम सुरू
१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु
⁠वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार
⁠सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणखी सुरु करणार
⁠रेडिओ क्लब जेटीसाठी २२७ कोटी रुपयांच्या काम सुरु होणार
मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

ॲट्रॉसिटी कायद्याचा साईड बिजनेस, हे एक मोठं रॅकेट; केतकी चितळेचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून राज्यातील रस्ते, सागरी सेतू, गडकिल्ल्यांचं संवर्धन, रेल्वेमार्ग, बंदरे, यांसह इतर अनेक प्रकल्पांची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=XuLEV9soiF8

follow us