‘खासदार निवडून दिला नाही तर विधानसभा लढणार नाही’, अजित पवारांचा बारामतीकरांना फायनल इशारा

‘खासदार निवडून दिला नाही तर विधानसभा लढणार नाही’, अजित पवारांचा बारामतीकरांना फायनल इशारा

बारामती : तुम्ही उद्या आम्ही उभा करून त्या खासदाराला विजय केले पाहिजे. तरच मी पुढे विधानसभेला उभा राहील, कारण मी इतके जर काम करून तुम्ही मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडला आहे, मला माझे धंदे पडले आहेत. मी कशाला तुमचे ऐकतोय. त्यामुळे आता आपण काय करायच याचा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, असा इशाराच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती लोकसभेतील (Lok Sabha) मतदारांना दिला आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती (Baramati) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार यांनीही त्याच उमेदवार असू शकतात याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अजित पवार हे संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढत आपलाच उमेदवार निवडून देण्याचे आवाहन करत आहे. (Ajit Pawar’s final warning to Baramatikars: ‘If Lok Sabha elections are not won, then Vidhan Sabha elections will not be contested’)

…म्हणून मुख्यमंत्री म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम करतो”; राऊतांचं नाव घेत केसरकरांचा खुलासा

दरम्यान, यावेळी अजित पवार म्हणाले, आपल्या राज्याची निर्मिती झाली, निवडणूक सुरू झाल्या तेव्हापासून आजपर्यंत समोर जेवढे उमेदवार होते त्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाले, ते फक्त बारामतीकरच करु शकतात. त्याचा मला रास्त अभिमान आहे. त्यामुळे बारामतीकरांना कमीपणा येईल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही. त्यामुळे तुम्ही उद्या आम्ही उभा करून त्या खासदाराला विजय केले पाहिजे. तरच मी पुढे विधानसभेला उभा राहील.

Manoj Jarange : “चौकशा करा, मी सुद्धा आता सगळं उघड करतो”; SIT चौकशीवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

कारण मी इतके जर काम करून तुम्ही मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडला आहे, मला माझे धंदे पडले आहेत. मी कशाला तुमचे ऐकतोय. त्यामुळे आता आपण काय करायच याचा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आता वेगवेगळे मान्यवर येतील, भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला भावनिक बनायच आहे की तालुक्याचा चाललेल्या विकासाची गती अशीच चालू ठेवायची आणि पुढच्या पिढीचे भले करायचे हे आपण ठरवायचे आहे, असेही ते म्हणाले.

भावनिक आवाहनाला बळी पडू नका :

अजित पवार मागील काही दिवसांपासून मतदारांना वारंवार भावनिक आवाहानला बळी पडू नका असे आवाहन करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत डाग लागला, तर राजकारणातील माझी किंमत कमी होईल, आगामी निवडणुकीत सर्वजण माझ्याविरोधात एकत्र येतील, अशी भीती व्यक्त करत आहेत. एवढेच नव्हे तर पवार कुटुंबामध्ये काय शिजते आहे याचाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पवार कुटुंबाची भावकी मोठी आहे. ही भावकी शरद पवार यांना साथ देईल असे बोलले जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube