…म्हणून मुख्यमंत्री म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम करतो”; राऊतांचं नाव घेत केसरकरांचा खुलासा

…म्हणून मुख्यमंत्री म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम करतो”; राऊतांचं नाव घेत केसरकरांचा खुलासा

Deepak Kesarkar : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा (Eknath Shinde) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे पटोले यांच्याशी बोलताना लिमीटच्या (Nana Patole) बाहेर गेलं की आपण कार्यक्रम करतो असे वक्तव्य करताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याबाबतीतच बोलल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या व्हिडिओवर काल दिवसभरात अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही स्पष्टीकरण दिले आहे.

केसरकर म्हणाले, खरंतर नाना पटोलेंना विचारायचं होतं की संजय राऊतांचं काय चाललंय. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की योग्य वेळ आल्यावर आम्ही कार्यक्रम करू. कारण तो कार्यक्रम कधीतरी होणं शक्य आहे. किती वाईट बोलावं याला काही मर्यादा असतात आणि तो कार्यक्रम चोख उत्तर देऊन होऊ शकतो असे त्यांनी सांगितल्याचे केसरकर म्हणाले.

मी अन् फडणवीस करेक्ट कार्यक्रम करणार; घाटगेंच्या विधानाने मुश्रीफांना धडकी

राज्यात आनंदाचं वातावरण असताना त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न कुणी करू नये. जरांगे पाटलांनी जे कष्ट घेतले त्याची जाणीव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही आहे. जे लोकांसाठी काहीच करू शकले नाहीत तेच लोक पाठीमागून अशा कुरघोड्या करत असतात. जरांगे पाटील यांनी याकडे लक्ष देऊ नये. महाराष्ट्राच्या इतिहासात एखादा मुख्यमंत्री आंदोलकाला भेटायला गेला त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहे. मात्र तरीही त्यांना काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात असतील तर जरांगे पाटलांना त्याकडे लक्ष देऊ नये, असेही केसरकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube