“साहेब समजून घ्या, मी नुसता मिरवणारा नाही तर”.. वसंत मोरेंनी अमित ठाकरेंना काय सांगितलं ?
Amit Thackeray on Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठावर मोर्चा (Pune) काढण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा होता. या मोर्चात मनसेचे स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. अमित ठाकरे आले. मोर्चाचं नेतृत्व केलं. प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. पण, या सगळ्यात एका खास प्रसंगाची चर्चा होत आहे. तो म्हणजे, अमित ठाकरे यांनी मोरेंना फोन करून तुम्ही दिसला कसे नाहीत हा. त्यानंतर वसंत मोरे (Vasant More) यांनी पुरावा देत ‘अमितसाहेब तुमच्यासाठी कायपण फक्त मला समजून घ्या. साहेब, मी काम करणारा आहे नुसता मिरवणारा नाही. त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल.’
‘मी पट्टीचा गारुडी!’ बाबर की मोरे? पुण्यात ‘मनसे’चा उमेदवार कोण? मोरेंच्या स्टेटसने भूकंपाचे संकेत
विद्यापीठातील विविध प्रश्नांसाठी अमित ठाक यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मनसे नेते वसंत मोरे त्यांना दिसले नाहीत. म्हणून अमित ठाकरेंनी त्यांना फोन करून कारण विचारलं. त्यानंतर मोरेंनी पुरावा देत मला समजून घ्या अशी विनंतीही केली.
या प्रसंगाचे स्पष्टीकरण मोरे यांनी दिलं. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा यशस्वी झाला. संध्याकाळी मला अमित साहेबांचा फोन आला. आजचा मोर्चा चांगला झाला. तुम्हीही कार्यकर्ते घेऊन आला होतात असं मला समजलं. पण, तुम्ही दिसला कसे नाहीत. भेटला कसे नाहीत, असे अमित ठाकरेंनी विचारल्याचे मोरे म्हणाले.
त्यानंतर मी साहेबांना म्हटलं. मी तुमच्या आसपासच होतो. त्याचा हा पुरावा.. ‘अमितसाहेब तुमच्यासाठी कायपण फक्त मला समजून घ्या. साहेब, मी काम करणारा आहे नुसता मिरवणारा नाही. त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल.’ मी तुमच्या मागेच चालत होतो. मी कायमच तुमच्या पाठिशी असेन. अमित साहेब फक्त मला समजून घ्या, असे मी त्यांना म्हणालो.
राज ठाकरेंच्या मनात साईनाथ बाबर? लोकसभेत वसंत मोरेंना कात्रजचा घाट?
दरम्यान, पुण्यात मनसेचा उमेदवार कोण असेल याची चाचपणी पक्षाच्या वरिष्ठांकडून केली जात आहे. काही जणांच्या नावांची चर्चाही झाली आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पुणे लोकसभेचे प्रभारी आहेत. त्यांनी पु्ण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकांचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला आहे. यानंतर आता पुणे लोकसभेचं तिकीट कुणाला मिळणार हे एक कोडं बनलं आहे. वसंत मोरे की साईनाथ बाबर यांपैकी कुणाला तिकीट मिळणार की ऐनवेळी तिसराच उमेदवार रिंगणात येणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.