Congress : आंदोलन करण्याची, जनतेची प्रश्न मांडण्याची एक पद्धत असते. हे वर्षानुवर्षांपासून चालत आले आहे. कधी ते आंदोलन करत होते आज आम्हीही करतोय यात वेगळे काही नाही. आंदोलन कसे असावे याबाबतीतही काही संकेत ठरलेले आहेत. पण दुर्दैवाने दोन दिवसांपूर्वी जे घडले ते विधानसभेच्या इतिहासात दुर्दैवी अशी गोष्ट आहे.
आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची अवहेलना करणाऱ्या घोषणा आणि कृती तेथे चालली होती. हे अत्यंत निषेधार्ह आहे. आमच्याकडे जसे राष्ट्रीय नेते आहेत तसे त्यांच्याकडेही आहेत. आमच्याकडे सुद्धा पायताणं आहेत हे विसरून चालणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारला दिला.
वाचा : सरकारने शब्द फिरवला, विरोधकांनी केला सभात्याग..
या प्रकरणात कडक विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली होती. आमच्याही सदस्यांकडून काही चुकले असेल तर कारवाई करा असेही आम्ही त्यांना म्हणालो होतो. मात्र, आज कारवाई जाहीर करतो असे अध्यक्षांनी सांगितले होते.
सरकारने शब्द फिरवला, विरोधकांनी केला सभात्याग..
परंतु ही जी नवी पद्धत पडत आहे. हे कुठेतरी बंद व्हावे, असा आग्रह आम्ही धरला होता. दुर्दैवाने आज सकाळीही त्यांनी तसे काही जाहीर केले नाही. अध्यक्षांचा वेळकाढूपणा चालला आहे. खरेतर यामध्ये सर्वात पहिली जबाबदारी ही अध्यक्षांची आहे. त्यांनी निरपेक्ष राहून निर्णय दिले पाहिजेत. आपल्या सभागृहात किंवा सभागृहाच्या प्रांगणात जर काही चुकीचे घडत असेल तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अध्यक्षांची असते. पण अध्यक्ष टाळाटाळ करताना दिसत आहे त्याचा आम्ही निषेध करतो, असे थोरात म्हणाले.
दरम्यान, याआधी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याच्या घटनेची सरकारी पक्षाने दखल घेतली नाही. कारवाई करण्याचा शब्द देऊनही कारवाई केली नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही सरकारने मान्य केली नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे असा आरोप करत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सरकारला पाठीशी घालण्याच्या भूमिकेचा निषेध करत आज विरोधकांनी सभात्याग केला होता.
https://www.youtube.com/watch?v=3vfNaAr-i4Q