Download App

Maharashtra Budget Session : कांदाप्रश्नी विरोधकांनी घेरलं; शिंदेंच्या मदतीला पुन्हा फडणवीस धावले

  • Written By: Last Updated:

Maharashtra Budget Session: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session)आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु करण्यात आलं. कांदा (Onion Price)आणि कापूस दरांवरुन (Cotton Price)विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं

विधानभवनात पायऱ्यांवर आंदोलन केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात देखील सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह भाजपच्या आमदारांनी कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा मांडला. कांद्यासोबत कापूस, तूळ उत्पादक शेतकऱ्यांसह इतर शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला घेरलं.

हेही वाचा : विधानभवनाच्या पायर्‍यांवर राडा, विरोधकांचं कांद्याच्या माळा घालून आंदोलन…

विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं, ते म्हणाले, ‘सभागृहाचे भावना लक्षात आल्या आहेत. शेतकऱ्यांचं सरकार आहे. निकष डावलून भरपाई दिली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे. नाफेडने खरेदी केली आहे. त्याचबरोबर जिथे सुरू नसेल तिथे सुरू केली जाईल. निर्यातीवर बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकार मदत जाहीर करेल.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऊत्तर दिल्यांनतरही विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला आणि विरोधक आक्रमक झाले. त्यावेळी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे यांच्या मदतीला धावले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री जबाबदारीने सांगताहेत. कांद्याची खरेदी सुरू झाली आहे. लाल कांद्याची खरेदीही सुरू झाली आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर मार्ग काढायचा की राजकारण करायचं हे ठरवलं पाहिजे. कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केली आहे. त्यांच्याकडे वेगळी माहिती असेल, तर त्यांनी हक्कभंग आणावा.”

हेही वाचा : Live Blog : विधानसभा अधिवेशन आणि सुप्रीम कोर्ट; कोण कोणाला धक्का देणार?

देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर मात्र विरोधक शांत झाले, सभागृहाच्या पुढील कामकाजाला सुरवात झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मदतीला देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा धावून आले, अशी चर्चा विधिमंडळात रंगली.

https://www.youtube.com/watch?v=fk7aUk63qJY

Tags

follow us