Live Blog : आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा शिंदे गटाकडूनच युक्तिवाद

  • Written By: Published:
Live Blog : आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा शिंदे गटाकडूनच युक्तिवाद

Maharashtra Budget Session : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (काल) सोमवारपासून सुरू झालं आहे. शिंदे-ठाकरे गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज असताना विरोधकांचा सामना करण्यासाठी सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही तयारी केली आहे.

त्यासोबत दिल्ली येथे राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी सुरु होणार आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सुनावणी सुरु होत आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जाईल. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत  यांचा युक्तीवाद संपला आहे.

शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणारंय. ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अ‍ॅड. नीरज किशन कौल, अ‍ॅड. मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी युक्तिवाद करतील. आजपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुनावणी होणारंय.

The liveblog has ended.

LIVE NEWS & UPDATES

  • 28 Feb 2023 05:04 PM (IST)

    पक्षफुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणीचा निर्णय का?

    आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा आज शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यानी केला. दरम्यान उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगण्याचे राज्यपालांचे निर्देश हे योग्यच होते. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांना काही प्रश्न विचारले.

    आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना ते बहुमत चाचणीसाठी मतदान कसे करणार असा प्रश्न सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला विचारला.

    सविस्तर वाचा :

    Thackeray Vs Shinde : पक्षफुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणीचा निर्णय का?

  • 28 Feb 2023 02:41 PM (IST)

    राजकीय पक्षात नाही तर विधिमंडळ पक्षात फूट पडली आहे हे कोण ठरवेल?

    आमदार, खासदार आणि काही अपक्ष उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला सांगितले.

    राजकीय पक्ष हे विधिमंडळ पक्षाशी थेट जोडलेले असतात. ठाकरेंनी निवडणूक एका पक्षासोबत लढवली पण दुस-या पक्षासोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे पक्षात असंतोष निर्माण झाला.

    शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद

  • 28 Feb 2023 02:38 PM (IST)

    शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु

    लंच ब्रेकनंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु झाला आहे. नीरज कौल युक्तिवाद करत आहेत.

     

  • 28 Feb 2023 01:00 PM (IST)

    ठाकरे गटाचा युक्तिवाद संपला

    आज ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद संपवला आहे.

    कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि कामत यांनी बाजू मांडल्यानंतर लंच ब्रेकसाठी कोर्टाचं कामकाज थांबलं आहे.

    लंच ब्रेकनंतर शिंदे गटाकडून वरीष्ठ वकील एन. के. कौल युक्तिवादाला सुरुवात करतील.

  • 28 Feb 2023 12:53 PM (IST)

    देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरू

    ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरू, अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद संपला. ठाकरे गटाचे तिसरे वकील युक्तिवाद करत आहेत.

    व्हीप बदलाविषयी युक्तीवाद सुरू अपात्र आमदारांचे प्रकरण सुप्रीम कोर्टाने निकाली काढावे, कामत यांचा युक्तिवाद

  • 28 Feb 2023 12:51 PM (IST)

    शिंदेंनी व्हीप जारी केला आहे. याचा अर्थ ते आमदारांना अपात्र करू शकतात

    “राज्याचे अधिवेशन सुरू आहे. अशावेळी शिंदेंनी व्हीप जारी केला आहे. याचा अर्थ ते आमदारांना अपात्र करू शकतात.”

    ठाकरेंचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद

  • 28 Feb 2023 11:59 AM (IST)

    सत्ता स्थापनेसंदर्भात राज्यपालांचे पत्र रद्दबातल ठरवा, ठाकरे गटाचा युक्तिवाद

    राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टात आजपासून पुन्हा सुरूवात

    आजदेखील ठाकरे गटाचा युक्तीवाद सुरू, ठाकरे गटाकडून ॲड अभिषेक मनू सिंघवी हेच आजही युक्तीवाद करत आहेत.

    सत्ता स्थापनेसंदर्भात राज्यपालांचे पत्र रद्दबातल ठरवा. आमदार अपात्र ठरले नसल्याचे राज्यपालांच्या पत्रावरून स्पष्ट होते. शिवाय उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख नसल्याचंही राज्यपालांच्या कृतीतून दिसते. त्यामुळे हे पत्रच रद्द करावं, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद

  • 28 Feb 2023 11:44 AM (IST)

    कांदाप्रश्नी विरोधकांनी घेरलं; शिंदेंच्या मदतीला पुन्हा फडणवीस धावले

    विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं, ते म्हणाले, ‘सभागृहाचे भावना लक्षात आल्या आहेत. शेतकऱ्यांचं सरकार आहे. निकष डावलून भरपाई दिली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे. नाफेडने खरेदी केली आहे. त्याचबरोबर जिथे सुरू नसेल तिथे सुरू केली जाईल. निर्यातीवर बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकार मदत जाहीर करेल.”

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऊत्तर दिल्यांनतरही विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला आणि विरोधक आक्रमक झाले. त्यावेळी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे यांच्या मदतीला धावले.

    Maharashtra Budget Session : कांदाप्रश्नी विरोधकांनी घेरलं; शिंदेंच्या मदतीला पुन्हा फडणवीस धावले

     

  • 28 Feb 2023 11:21 AM (IST)

    सरकार कांदा आणि कापूस उत्पादकांच्या पाठिशी ठाम

    विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी कांदा आणि कापसाच्या दराचा मुद्दा उपस्थित केला.

    तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नसून सरकार कांदा आणि कापूस उत्पादकांच्या पाठिशी ठाम असल्याचं नमूद केलं. तसेच, सरकार कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत करेल. असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिलं.

  • 28 Feb 2023 11:15 AM (IST)

    विधानसभेत नाना पटोले आक्रमक

    विधानसभेत कांदा दराच्या प्रश्नावर आक्रमक झालेले दिसले. त्यांनी कांदा दरासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्यात वाढवावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube