MNS Leader Vasant More : महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. त्यासाठी नवी मुंबईच्या खारघऱ येथे भव्य कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. पण या सोहळ्याला एका गालबोट लागले आहे.
या कार्यक्रमासाठी आलेल्या 11 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जण एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावरुन राज्य सरकारवर सर्वस्तरातून टीका करण्यात येते आहे. यानंतर आता मनसे नेते वसंत मोरे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. यामध्ये त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.
ठाकरे-पवारांसमोरच जयंत पाटलांचे सूचक विधान! म्हणाले… कुछ तो मजबुरीया…!
सरकारने ८ क्विक रिस्पॉन्स टीम, वनविभागाचे कर्मचारी, सर्पमित्रांची एक मोठी टीम, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या, सिडकोकडून पाण्याची सेप्रेट नवीन लाईन, १३ वेगवेगळ्या कंपनीचे टॉवर जर इतकी व्यवस्था सरकारने केली होती तर याचाच अर्थ उष्माघाताचा त्रास श्रीसेवकांना होवू शकतो हे त्यांना माहीतच होते. इतके सगळे नियोजन केलेच होते तर मग वेळेचे नियोजन सरकारला का करता आले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
याही पेक्षा सोपे कितीतरी कोटी रुपये या समारंभावर सरकारने खर्च केले. तेच पैसे जर महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ट्रस्टला दिले असते तर त्यांनी ते पैसे खऱ्या अर्थाने लोकोपयोगासाठी खर्च केले असते आणि त्या ८ निष्पाप श्रीसेवकांचा जीव ही वाचला असता, असे म्हणत वसंत मोरे यांनी सरकारला सुनावले आहे.