Vijay Wadettiwar : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Market Committee Elections) अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजप अशी युती झाली होती. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काही ठिकाणी कारवाईही केली होती. या मुद्द्यावर आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पटोले यांचे नाव न घेता टोला लगावला.
वडेट्टीवार म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. आपसात ताळमेळ करुन त्या लढल्याा जातात. कारवाई करायचीच असेल तर सर्वांवर कारवाई करावी लागेल. सहकार क्षेत्रात कारवाई करत असताना ती विचार करून केली पाहिजे, असे म्हणत त्यांना प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे नाव न घेता टोला लगावला.
Sharad Pawar : एकाचवेळी पवारांनी फडणवीस, चव्हाण अन् राऊतांना घेतले पट्टयात
राज्यात अनेक ठिकाणी अभद्र युती झाली आहे. त्यामुळे मग सर्वांवरच कारवाई केली जाणार आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
सामनातील अग्रलेखावरूनही त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले, सर्वांनी संयम ठेऊन बोलावे. महाविकास आघाडीचा जोड थोडा ढिला झाला होता पण, आम्ही फेविकॉल लावून तो जोडत जाऊ. भविष्यात महाविकास आघाडीचेच दिवस आहेत. आघाडी तोडण्याची भाषा करू नये, जोडण्याची भाषा करावी. लिहिताना, बोलताना संयम ठेवावा, असे वडेट्टीवार म्हणाले.
पवारांकडून चव्हाणांचा पाणउतारा; म्हणाले, त्यांची पक्षात काय जागा ते आधी तपासावं
भाजपला फायदा होणार नाही
कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रचार केला. 30 पेक्षा जास्त सभा घेतल्या. रोड शो केले. मात्र त्यानंतरही त्यांना बजरंग बलीचा आधार घ्यावा लागला. भाजपला येथे काहीच फायदा होणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.