Sharad Pawar : एकाचवेळी पवारांनी फडणवीस, चव्हाण अन् राऊतांना घेतले पट्टयात

  • Written By: Published:
Sharad Pawar : एकाचवेळी पवारांनी फडणवीस, चव्हाण अन् राऊतांना घेतले पट्टयात

Sharad Pawar Attack on Pruthviraj Chavhan FAdanvis And Sanjay Raut : कर्नाटकातील निवडणुकांच्या प्रचारादरम्यान निपाणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचं पार्सल पुन्हा महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काम न करता शब्दांचा खेळ करणं हे काही लोकाचं वैशिष्ट्य” असल्याचे म्हणत पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ‘सामना’ वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अग्रलेखावरील जोरदार प्रत्युत्तर दिले. पवारांच्या या टीकेला आता फडणवीस नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Khargone Bus Accident : मध्यप्रदेशात मोठा अपघात; 50 फूट नदीत बस कोसळली, 15 जणांचा मृत्यू

सामनातील अग्रलेखावरून राऊतांचा समाचार

पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले अशी टीका ‘सामना’तील अग्रलेखात करण्यात आली होती. त्यावर शरद पवार म्हणाले की, “आम्ही काय केलं हे त्यांना माहित नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही पक्षातील सहकारी अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मतं व्यक्त असतात. पण बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी करत नाही. हा आमच्या घराचा प्रश्नअसल्याचे सांगत पवारांनी अग्रलेखावरून राऊतांचा जोरदार समाचार घेतला.

Khargone Bus Accident : मध्यप्रदेशात मोठा अपघात; 50 फूट नदीत बस कोसळली, 15 जणांचा मृत्यू

सामनामध्ये नेमकं काय म्हंटले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.

मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त

पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षातील स्थान काय?
यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचाही समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक निवडणुकीतील प्रचारादरम्यान केला होता. यावर बोलताना पवार म्हणाले की, “पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते ए आहे की बी, सी किंवा डी आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहेत ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार.” अशी टीका पवारांनी केली आहे. यावर आता चव्हाण काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube