Download App

Corona Updates : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढू लागला… नवे १११५ बाधित!

Maharashtra Corona Updates : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत (बुधवारी) कोरोनाचे १११५ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच ९ जणांचा मृत्यू झाला असून ५६० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बाहेरुन राज्यात येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग काटेकोरपणे करण्याचे आदेश दिल्याचे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोरोना चाचणीसाठी २ टक्के नमुने घेण्यात आले आहेत. दिल्लीत कोरोनाचे सुमारे एक हजार नवीन रुग्ण आढळले.

‘त्यांच्या कष्टाला सलाम’ : दुधवाल्याबरोबरचा सुप्रिया सुळेंचा तो सेल्फी व्हायरल – Letsupp

देशात कोरोनाचे ४०२१५ सक्रिय रुग्णगेल्या २४ तासांत भारतात कोरोना विषाणूचे सुमारे आठ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४०२१५ झाली आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ५३१०१६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५४२१ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ५६० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के असून बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के इतके आहे.

Tags

follow us