Download App

Maharashtra Covid Update: राज्यात कोरोनाचा कहर, सलग तिसऱ्या दिवशी रूग्णसंख्या हजारच्या पुढे

Maharashtra Corona Update: गेले अनेक महिने देश आणि राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असताना आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहे. तर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि मास्क सक्ती करण्यात आली आहे.

दुसरीकडे राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज शुक्रवारी राज्यात 1152 नवे रूग्ण आढळून आहेत. त्यामुळे आता राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या 5928 झाली आहे. तर आतापर्यंत 4 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सलग तिसऱ्या दिवशी एक हजाराहून आधिक रूग्ण आढळले आहेत.

Satej Patil – Amal Mahadik : कारखान्याची कागदपत्रं घेऊन बिंदू चौकात या; अमल महाडिक यांच सतेज पाटलांना आव्हान

गुरूवारी 13 एप्रिलला राज्यात 1086 रूग्ण आढळून आले होते. एका रूग्णाचा मृत्यू झाला होता. तर बुधवारी 1२ एप्रिलला राज्यात 1,115 रूग्ण आढळून आले होते. गेल्या 24 तासामध्ये 920 रूग्ण बरे झाले आहेत. तसेच 14 एप्रिलपर्यंत 80 लाख 126 लोक बरे झाले आहेत. म्हणजे रिकव्हरी रेट 98.11 टक्के आहे. सर्वाधिक रूग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 1643 सक्रिय रूग्ण आहेत. तर ठाण्यात 1056 सक्रिय रूग्ण आहेत.

Tags

follow us