Download App

शेतकऱ्यांना छळणारे सावकार रडारवर; फडणवीसांनी विधानपरिषदेत केली मोठी घोषणा

Devendra Fadnavis : शेतकरी अडचणींमुळे सावकाराकडे जातात. अनेक सावकार अवैध धंदा करतात. आपण त्यांना वैध लायसन देतो त्यामुळे त्यांच्यावर आपले नियंत्रण असते. किती व्याज घ्यावे याचा नियम असतो. मात्र, काही जण लायसन नसताना सावकारी करतात. मागील दोन ते तीन वर्षात सांगली जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात मोठी कारवाई केली. पिडीतांकडूनही तक्रार घेण्याचे काम करणार आहोत.  अवैध सावकारी विरुद्धच्या कायद्याला आणखी प्रसिद्धी देऊ, येणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई करू अशी ग्वाही राज्याचे  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विधानपरिषदेत आज अवैध सावकारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यावेळी फडणवीस यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, की सांगली जिल्ह्यात. 2020 मध्ये 14 गुन्हे दाखल झाले. यामध्ये कारवाई झाली. 2021 मध्ये 35 व 2022 मध्ये 35 गुन्हे दाखल झाले. तसेच आता चालू वर्षात जानेवारी महिन्यात एक गुन्हा दाखल झाला  या सर्व गुन्ह्यांवर कारवाई केली आहे.

वाचा : Devendra Fadnvis : शेतकऱ्यांना रुपयांत पीकविमा दिला तर पोटात का दुखतंय?

मोठ्या प्रमाणात सावकारी सुरू असल्याने गुन्हे दाखल होत असतील तर त्यावर कारवाई अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. कारवाई होते आहे म्हणून लोक समोर येत आहेत. पिडीतांकडून तक्रार घेण्याचे काम करतोय. पुन्हा सूचना देऊ, प्रसिद्धी देऊ. आलेल्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

शेती करता घेतलेले कर्ज तारण कर्ज असेल तर 9 टक्के आणि बिगर तारण कर्ज असेल तर वार्षिक 12 टक्के व्याज दर आकारतो. त्यापेक्षा जास्त घेता येत नाही. बिगर शेती कर्ज असेल तर 15 टक्के तारण व 18 टक्के बिगर तारण कर्जासाठी व्याजदराची मर्यादा घालून दिली आहे. यापेक्षा जास्त दराने व्याज घेतले जात असले तर कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होते.

Devendra Fadanvis : शिंदेंनी सांगितलं की मी लगेच ऐकतो; विधानसभेत फडणवीसांची जोरदार बॅटिंग

अवैध सावकाराकडून शेती व्यतिरिक्तचे कर्ज मोठ्या प्रमाणात घेतले जातात. एखाद्या वर्षी पीक नुकसान झाले तर कर्ज थकते व वसुलीचा तगादा सुरू होतो. त्यामुळे समस्या निर्माण होतात.  मुळातच कर्जमाफीचा उद्देशच शेतकऱ्याने सावकाराकडे जाऊ नये हाच आहे. त्यांनी पुन्हा बँकेतून कर्ज घ्यावे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी रिजर्व्ह बँकेने दिलेले निर्देश पाळावे लागतात, असे फडणवीस म्हणाले.

 

Tags

follow us