Download App

राज ठाकरे-अमित शाह भेटीत काय घडलं? फडणवीस म्हणतात, आणखी दोन दिवसानंतर…

Devendra Fadnavis on Raj Thackeray Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? राज ठाकरेंनी किती जागांची मागणी केली? अमित शाह काय म्हणाले? खरंच मनसे महायुतीत येणार का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतीलही. परंतु, या बैठकीत नेमकं काय घडलं याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या बैठकीतील घडामोडींवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली आहे. आताच काहीतरी बोलण्यापेक्षा आणखी एक दोन दिवस वाट पहा. त्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही तु्म्हाला नीट सविस्तरपणे समजावून सांगू, अशा सूचक शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली. राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, अजूनही महायुतीतील जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यावरही फडणवीस यांनी भाष्य केले.

Loksabha Election : मनसेचे इंजिन महायुतीला जोडणार ? राज ठाकरे तातडीने दिल्लीला

माढा, बारामतीचे जागावाटप आणि उमेदवार ठरले का?

माढा असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ असेल. सगळ्यांचं एकच लक्ष असेल ते म्हणजे महायुतीला मजबूत करणं. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं. त्यामुळे ज्या काही थोड्याफार त्रुटी राहिल्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत. मी जितक्या बैठका घेतल्या आहेत त्या अतिशय सकारात्मक झाल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज ठाकरे-अमित शाहांच्या बैठकीत काय चर्चा ?

या बैठकीत भाजपाचे जुने सहकारी उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख  (Uddhav Thackeray) निघाला. राज ठाकरे यांनी दोन जागांची मागणी केली. परंतु, शाह यांनी एकच जागा देता येईल असं सांगितलं. तसेच विधानसभेबाबतही कोणतीच कमिटमेंट या बैठकीत दिली नाही. विधानसभा एकत्र लढू पण त्यावेळचं जागावाटप त्यावेळी ठरवू. याआधी 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा नको, म्हणून आताच्या घडीला फक्त लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलू, अशी स्पष्ट भूमिका अमित शाह यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे.

follow us