Eknath Shinde : राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे आजही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक आहेत. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार गदारोळ घातला. यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांना उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्वतः मोर्चा सांभाळला. त्यांनीही संतापाच्या भरात विरोधकांवर जोरदार प्रहार केले.
वाचा : राहुल गांधी मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही, नाना पटोले मोदींवर बरसले
शिंदे म्हणाले, काल विधिमंडळाच्या आवारात जो प्रकार घडला त्याचे समर्थन आम्ही करत नाही. याबाबत आमची बैठकही झाली आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून आमचे फोटो लावून खोके म्हणणे, आम्हाला चोर म्हणणे, मिंधे म्हणणे, गद्दार म्हणणे हे कोणत्या आचारसंहितेत बसते, असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना खोके म्हणणं, मिंधे म्हणणं. चोर म्हणणं हे कोणत्या आचारसंहितेत बसतं नाना ?, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना उद्देशून केला.
राहुल गांधींच्या फोटोला सत्ताधाऱ्यांनी मारले जोडे; अजितदादा संतापले म्हणाले, असे प्रकार..
आम्ही कालच्या प्रकाराचे कधीच समर्थन केले नाही. मात्र, सावरकरांचा अपमान करणे हा सुद्धा देशद्रोहच आहे. ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळी तीन बोटे आपल्याकडे असतात. त्यामुळे आमचीही विनंती आहे, की सभागृहाचे पावित्र्य जपा. सभागृहाच्या बाहेर सुद्धा कोणतेही काम होऊ नये. त्याला आक्षेप घेतला पाहिजे, असे शिंदे म्हणाले.