Maharashtra government wakes up after Rajasthan incident! Orders immediate audit of dangerous schools : राजस्थानमध्ये शाळेचं छत कोसळून 4 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र महाराष्ट्रात अशी परिस्थिती येऊ नये म्हणून राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. त्यासाठी तात्काळ बैठक घेण्यात आली आहे. तसेच धोकादायक शाळांचं तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश देखईल देण्यात आले आहेत. अशी माहिती राज्यमंत्री पंजक भोयार यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले पंकज भोयार?
दुर्दैवाने 4 विद्यार्थ्यांचा राजस्थानमध्ये मृत्यू झाला. मात्र महाराष्ट्रात अशी परिस्थिती येऊ नये म्हणून तातडीने बैठक घेतली. प्रधान सचिव, आयुक्त, संचालक व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कमजोर शाळा आहेत, त्यांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. जी धोकाधोकादायक शाळा आहे, त्यासाठी तातडीने जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्याचे आदेश दिले आहेत.
रडण्याचे भन्नाट फायदे! वाचा हेल्थ सीक्रेट…
त्याचबरोबर त्यांनी यावेळी इतर प्रश्नांना देखील उत्तरं दिली. मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत सामनातून करण्यात आलेल्या दाव्यावर भोयार म्हणाले की, मी काही सामना वाचत नाही. पण असे काही निर्णय होईल वाटत नाही. वरिष्ठ नेते हे निर्णय घेत असतात. तसेच चित्रपट गृह मराठी चित्रपटांना उपलब्ध होतात. जिथे होत नसतील, तिथे आम्ही मदत करू. आमच्यासोबत संपर्क साधावा.
मंदिराचा वाद अन् दोन देशांत पडली युद्धाची ठिणगी; कंबोडिया-थायलंड वादाची इनसाइड स्टोरी
जलजीवन मिशनचा उद्देश प्रत्येकाला पाणी मिळावे असा आहे. बरेच देयके दिली आहेत. आता वाढीव कामांसाठी रक्कम दिली जाईल. तशी तरतूद नुकत्याच झालेल्या अधिवेशनात केली आहे, पण पुन्हा तरतूद केली जाईल. लाडकी बहिणी महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण सुरु केलीय. गरजूंना मदत करण्यासाठीच ही योजना आपण आणलीय. अशी माहिती राज्यमंत्री पंजक भोयार यांनी दिली आहे.