रडण्याचे भन्नाट फायदे! वाचा हेल्थ सीक्रेट…

रडण्याचे भन्नाट फायदे! वाचा हेल्थ सीक्रेट…

Crying Beneficial For Health : बहुतेक वेळा रडणाऱ्या व्यक्तीकडे कमकुवत (Crying Benefits) म्हणून पाहिलं जातं. ‘का रडतेस? कमजोर आहेस का?’ अशा प्रतिक्रिया समाजात सर्रास ऐकू येतात. पण, तुम्हाला माहितीय का? रडणं ही एक नैसर्गिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर प्रक्रिया आहे. रडणं म्हणजे फक्त भावना व्यक्त करणं नाही, तर ते मन, शरीर आणि मेंदू यांच्यातील नकारात्मक (Health Tips) गोष्टी बाहेर काढण्याचं एक सशक्त माध्यम आहे.

हेल्थलाइन या आंतरराष्ट्रीय आरोग्य संकेतस्थळानुसार, अश्रूंचे तीन प्रकार असतात.

रिफ्लेक्स अश्रू – डोळ्यांत गेलेली धूळ, धूर किंवा घाण बाहेर टाकण्यासाठी हे अश्रू निर्माण होतात. ते आपले डोळे स्वच्छ ठेवतात.
सतत अश्रू (बेसल टियर्स) – डोळ्यांना ओलसरपणा देतात. डोळ्यांना संसर्गापासून वाचवतात. त्यात 98 टक्के पाणी असतं.
भावनिक अश्रू – हे अश्रू भावनिक प्रतिक्रिया देताना येतात. यातून शरीरातील ‘कॉर्टिसोल’सारखे तणाव संप्रेरक आणि इतर विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

मुलींचा क्लासमधील वाद घरापर्यंत पोहचला; पोलिसाच्या भावाकडून दाम्पत्याला अमानुष मारहाण

रडण्याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम

1. मन हलकं होतं
रडल्यावर शरीरातील पॅरासिंपॅथेटिक नर्व्हस सिस्टीम सक्रिय होते, जी आपल्याला मानसिक आणि शारीरिक शांती मिळवून देते. त्यामुळे मनात दडपलेलं दुःख, निराशा किंवा अस्वस्थता बाहेर येते आणि मन हलकं होतं.

2. वेदना कमी होतात
रडताना शरीरातून एंडोर्फिन हे नैसर्गिक ‘पेनकिलर’ हार्मोन स्त्रवते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक वेदनांमध्ये खूपच आराम मिळतो.

मोठी बातमी: धनंजय मुंडेंची वाईल्ड एन्ट्री तर कोकाटेंच्या राजीनाम्याची स्क्रीप्ट, वाचा नेमकं काय घडलं?

3. दुःखावर मात करता येते
दु:ख सहन करत राहण्याऐवजी ते व्यक्त करणे मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. रडणं म्हणजे आपल्याला झालेलं नुकसान, वेदना आणि तणाव स्वीकारून त्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग असतो.

4. मूड सुधारतो
रडल्यामुळे आपल्या मूडमध्ये सकारात्मक बदल होतो. एक प्रकारची मानसिक सफाई होते आणि भविष्यातील गोष्टींसाठी मन पुन्हा सज्ज होतं. ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.

5. निद्रानाशावर उपाय
संशोधनानुसार लहान मुले रडल्यावर शांत झोप घेतात. हेच मोठ्यांनाही लागू होतं. रडल्यावर मानसिक ताण कमी होतो आणि झोप लागण्यास मदत होते. झोप उत्तम झाली की थकवा, डोकेदुखी, चिडचिड हे त्रास आपोआप कमी होतात.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube