ब्रेकिंग : वैष्णवी हगवणे प्रकरण भोवलं; IG जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाचा दणका; कार्यभार काढला

Maharashtra Home Department Widraw Charg From IG Supekar : वैष्णवी हगवणे मृत्युप्रकरणात चर्चेत आलेल्या IG जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने दणका दिला असून, सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. याबाबत गृहविभागाने आदेशदेखील जारी केले आहेत. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) मृत्युप्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर […]

Letsupp Image   2025 05 29T162059.250

Letsupp Image 2025 05 29T162059.250

Maharashtra Home Department Widraw Charg From IG Supekar : वैष्णवी हगवणे मृत्युप्रकरणात चर्चेत आलेल्या IG जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने दणका दिला असून, सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. याबाबत गृहविभागाने आदेशदेखील जारी केले आहेत. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) मृत्युप्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सुपेकर यांना दणका देत त्यांच्याकडील नाशिक, संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.

‘वैष्णवीचं आधीच दोनदा लग्न…’, वडील अनिल कस्पटेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, हगवणेंवर गंभीर आरोप

पत्रिकेत मुलाचे मामा म्हणून सुपेकरांचे नाव

काहीवेळापूर्वी वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या वकिलांकडून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पत्रकार परिषदेत मुलाच्या जन्मपत्रिकेत जालिंदर सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचे नाव आहे, असेही सांगितले होते. त्यानंतर, काही वेळातच सुपेकरांकडून कार्यभार काढून घेण्यात आला आहे. जालिंदर सातपुते हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजी नगर , नाशीक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. मात्र, आता हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आलाय.

500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असणारे वैष्णवीचे मामासासरे

जालिंदर सुपेकर हे वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक हगवणेचे मामा आहेत. त्यांची माहिती घेतली असता या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनांवर हगवणे कुटुंबियांनी अत्याचार केल्याचा दावा दमानिया यांनी केला होता. एवढेच नव्हे तर, जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्यावर 500 कोटींच्या स्कॅमचा आरोप असून, यासंदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे.

तसेच हगवणे कुटुंबिय मोठी सून मयुरीला तू आमचं काहीही बिघडू शकत नाही, आमचे हात फार मोठे आहेत, अशी धमकी देत असल्याचे दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. तर, दुसरीकडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना  हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक असून, त्यांच्याशी निगडित प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही. त्यासोबतच गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचा त्यांच्याशी संवादही झालेला नसल्याची प्रतिक्रिया सुपेकर यांनी दिली होती.

दामियांनी भर पत्रकार परिषदेत ऐकवली IG सुपेकरांची क्लिप

जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात महिला आयोगामध्ये मयुरीच्या आईने पत्र लिहिलं आहे. मेहुण्याचा आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केलं आहे. पीएसआय अशोक सादरे यांची एक आत्महत्या पूर्वीची सुसाईड नोट आहे. पैसे कलेक्ट करायला लावायचे दागिने द्यायला लावायचे सुपेकरांची ताकद हगवणे कुटुंबाच्या मागे उभे होती म्हणून त्यांनी हे सर्व केल्याचंही दमानिया म्हणाल्या होत्या.

भलताच प्रकार! फरार निलेश चव्हाणची खोटी माहिती देऊन पोलिसांनाच बनवलं; फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत. कराडला सुद्धा जे समर्थन मिळालं ते सुद्धा या सुपेकरांमुळं मिळाल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय.

प्रेम प्रकरणापासून छळापर्यंत… मास्टरमाईंड करिश्मा हगवणेच! संपूर्ण कटाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

500 कोटीच्या घोटाळ्यामध्ये माझं नाव वगळून दुसऱ्या अधिकाऱ्यांचे नाव घाल, अमिताभ गुप्ता यांचं नाव घाल असं सुपेकर म्हणताना ऐकू येत आहे. एका ऑडिओ क्लिपमध्ये ही माहिती असल्याचे दमानिया म्हणाल्या. ही ऑडिओ क्लिप मी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे दमानिया म्हणाल्या. आताच्या घटकेला ही अन व्हेरिफाइड क्लिप असली तरी ती व्हेरिफाइड करणं सरकारच्या हातात आहे. असे म्हणत दमानिया यांनी ऑडिओ क्लिप ऐकवली.

गृहविभागाचे आदेश HOME DEPT ORDER

Exit mobile version