HSC-HSC Exam Result Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर आता पालकांसह विद्यार्थांना निकालाचे वेध लागले असून, बोर्डाकडून याबाबत महत्त्वाचे संकेत देण्यात आले आहे.
नुकताच सीबीएससी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या परिक्षांचा निकाल कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता बारावीचा निकाल 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता बोर्डाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर, दहावीचा निकाल जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Nitesh Rane : दंगली घडवणारा मास्टरमाईंड मातोश्रीवर, नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात
दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15,77,256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8,44,116 मुले तर 7,33,067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5,033 सेंटरवर दहावीची परीक्षा झाली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे. निकाल पाहण्यासाठी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळासोबत विद्यार्थी किंवा पालक mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या लिंकवर जाऊन निकाल पाहू शकतात.
Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष
कुठे पाहाता येईल निकाल?
दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यी www.mahresult.nic.in , www.hscresult.mkcl.org, www.mahahhscboard.in या संकेतस्थळांवर भेट देऊन रिझल्ट पाहू शकणार आहेत.